'मराठ्यांच्या राजाची, मराठी बाण्याची', छावा पाहिल्यानंतर प्राजक्ता माळीला अश्रू अनावर
Prajakta mali on Chhava Movie : 'मराठ्यांच्या राजाची, मराठी बाण्याची', छावा पाहिल्यानंतर प्राजक्ता माळीला अश्रू अनावर

Prajakta mali on Chhava Movie : छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा दाखवणारा छावा हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाने येसूबाईंची तर अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. सिनेमाने अवघ्या तीन दिवसांत कमाईच्या बाबतीत 100 कोटींचा आकडा पार केलाय.
View this post on Instagram
अभिनेत्री प्राजक्ता माळीला अश्रू अनावर
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील छावा सिनेमा पाहिलाय. त्यानंतर तिने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्राजक्ता माळी म्हणाली, छत्रपती संभाजी महाराज की जय... मराठ्यांच्या राजाची, मराठी बाण्याची,... सिंहाच्या छाव्याची गोष्ट जगभरात पोहोचवली..त्याबद्दल दिग्गदर्शक लक्ष्मण उतेकर आणि मॅडडॉक फिल्मचे मनापासून आभार... काल छावा चित्रपट पाहिला आणि अश्रू अनावर झाले...असंही तिनं सांगितलं.
View this post on Instagram
View this post on Instagram
छावा ने तीन दिवसांत 100 कोटींची कमाई करत मोडला विक्रम
लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या छावा या सिनेमाने अवघ्या 3 दिवसात 100 कोटींची कमाई करून स्काय फोर्सचा रेकॉर्ड मोडित काढलाय. अक्षय कुमारच्या स्कायफोर्सने 8 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार केला होता. त्याचबरोबर छावाने यापेक्षा तिप्पट वेगाने कमाई करत 100 कोटींचा टप्पा गाठला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
