(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pulwanti On OTT: आता घरबसल्या पाहता येणार फुलवंती, 'या' OTT वर झाला रिलिज, प्राजक्तानं व्हिडिओ शेअर करत सांगितलं..
नृत्यांगना ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकट शास्त्री’ यांच्यातील पैज आणि आव्हानांवर हा सिनेमा आधारित आहे.
Phulwanti on OTT:मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला फुलवंती चित्रपट आता तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे. पेशव्यांच्या दरबारात आपल्या नृत्यानं पाहणाऱ्याला घायाळ करणारी फुलवंती आता ओटीटीवर रिलिज झाली आहे. ११ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला फुलवंती चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर रिलिज झाला असून आता तो प्रेक्षकांना मोफत पाहता येणार आहे. सातव्या आठवड्यात पदार्पण करणारा हा सिनेमा २२ नोव्हेंबरपासून प्राईमवर प्रदर्शित झाल्याचं अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सांगितलं.
चित्रपटगृहात चित्रपट चालू असताना OTT Platform वर इतका उदंड प्रतिसाद मिळणे, हे केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं.फुलवंतीवर जितक प्रेम तुम्ही चित्रपटगृहात केलत, तितकंच प्रेम या माध्यमात देखील कराल याची खात्री आहे. असं लिहित तिनं चाहत्यांना ही बातमी दिली.
८ नोव्हेंबरपासून ओटीटीवर पण..
प्राजक्ता माळी निर्मिती क्षेत्रात फुलवंती चित्रपटातून पहिल्यांदाच उतरली आहे. त्यामुळे तिच्या अभिनयाची आणि निर्मितीची सुरुवातीपासूनच चर्चा होती. खरंतर ९ नोव्हेंबरपासूनच फुलवंती ओटीटीवर रिलिज झाला होता. मात्र, ओटीटीवर तिकीट काढून हा चित्रपट पहावा लागत होता. आता प्राजक्ता माळीनं व्हिडिओ शेअर करत ॲमेझॉनवर हा चित्रपट मोफत पाहता येणार असल्याचं सांगितलंय. पॅनइंडिया लेवलवर तिकीट काढून सर्वाधिक पाहिलेला हा सिनेमा ठरला, हॉलिवूड चित्रपटही यात मागे असल्याचं प्राजक्तानं सांगितलं. आता ॲमिझॉन प्राईमचं सब्स्क्रीप्शन असणाऱ्या सगळ्यांना मोफत हा चित्रपट पाहता येणार आहे असंही तिनं सांगितलं.
काय म्हणाली प्राजक्ता?
तुम्हा सगळ्यांच्या प्रेमळ प्रतिसादामुळे फुलवंती च आज #७ व्या आठवड्यात पदार्पण होतय…
आणि याच निमित्ताने आपला चित्रपट फुलवंती आजपासून Amazon Prime वर सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे😇
चित्रपटगृहात चित्रपट चालू असताना OTT Platform वर इतका उदंड प्रतिसाद मिळणे, हे केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं.
फुलवंतीवर जितक प्रेम तुम्ही चित्रपटगृहात केलत, तितकंच प्रेम या माध्यमात देखील कराल याची खात्री आहे🥰
View this post on Instagram
सिनेमाची कथा काय?
‘फुलवंती’ ही भारतभर किर्ती असलेली नर्तिका आहे. ज्या भूमिकेत प्राजक्त माळी आहे. ती कार्यक्रमाच्या निमित्तानं तिचं पुण्यात तेही पेशवे दरबारात तिचं येणं होतं. तिथे तिची व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्याशी भेट होते. ही भूमिका अभिनेता गष्मीर महाजनी साकारत आहे. त्यांच्या भेटीनंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागतं.नृत्यांगना ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकट शास्त्री’ यांच्यातील पैज आणि आव्हानांवर हा सिनेमा आधारित आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात मांडण्यात आलीये.