(Source: Poll of Polls)
Hollywood Movies Banned In India Watch On OTT: ओटीटीवर आहे भारतात अश्लीलतेमुळे बंदी असलेले हॉलिवूड चित्रपट, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहाल?
Hollywood Movies Banned In India Watch On OTT: भारतात अशा चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळत नाही. त्यामुळेच भारतात अशा चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यातील काही चित्रपट भारतात ओटीटीवर पाहता येतील.
Hollywood Movies Banned In India Watch On OTT : हॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यात अॅडल्ट सीन्सचा भडिमार आहे. परदेशात असे चित्रपट पाहिले जात असतील. पण, भारतात अशा चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळत नाही. त्यामुळेच भारतात अशा चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यातील काही चित्रपट भारतात ओटीटीवर पाहता येतील.
आय स्पिट ऑन युवर ग्रेव ( I Spit On Your Grave)
'आय स्पिट ऑन युवर ग्रेव्ह' हा चित्रपट 1978 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात भरपूर लैंगिक हिंसा दाखवण्यात आली आहे. त्यामुळे केवळ भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटाचा भाग 2 देखील 2010 साली प्रदर्शित झाला होता, परंतु त्यावरही बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
मॅजिक माईक एक्सएक्सएल Magic Mike XXL
हा चित्रपट एका पुरुष स्ट्रीपरच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली आहेत. हा चित्रपट भारतात रिलीज करण्यासाठी दोनदा विनंती करण्यात आला होता. मात्र चित्रपटात लैंगिकतेचे कारण देत विनंती फेटाळण्यात आली. दुसऱ्यांदा काही दृश्ये कापून चित्रपटाला मंजुरी मिळाल्यावर नंतर ती नाकारण्यात आली. आता हा चित्रपट जिओ सिनेमावर पाहता येईल.
फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे Fifty Shades Of Grey
डकोटा जॉन्सन आणि जेमी डोर्नन यांच्या फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे या रोमँटिक ड्रामा चित्रपटात अनेक लैंगिक दृश्ये दाखवली आहेत. दोन तास पाच मिनिटांच्या या चित्रपटाचे सिक्वेल आहेत. सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या दृष्टीने आक्षेपार्ह मानला गेला होता. मात्र, दृश्ये कापूनही सेन्सॉर बोर्डाला चित्रपटाला प्रमाणपत्र देणे योग्य वाटले नाही आणि त्यावर बंदी घालण्यात आली. सध्या हा चित्रपट जिओ सिनेमावर उपलब्ध आहे.
डर्टी ग्रँडपा (Dirty Grandpa)
डर्टी ग्रँडपा 2016 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट जेसन केली आणि त्याचे आजोबा डिक केली यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात दादाची भूमिका साकारणारा रॉबर्ट डिनेरो अतिशय कॉमिक आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला आक्षेपार्ह म्हणत चित्रपटाला परवानगी नाकारली. 'डर्टी ग्रँडपा' आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
द गर्ल विद द ड्रॅगन टॅटू The Girl With Dragon Tattoo
द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू 2011 मध्ये रिलीज झाला होता. या मिस्ट्री थ्रिलर चित्रपटात अनेक आक्षेपार्ह बलात्काराची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. या चित्रपटात काही अत्याचाराची दृश्येही होती. अशा परिस्थितीत चित्रपटातून अशी दृश्ये कापण्यास सांगितले होते. निर्मात्यांनी याला स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली होती. आता तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.