Top 5 Fashion Designers : 'हे' आहेत बॉलीवूडचे 'टॉप 5' फॅशन डिझायनर, पैशाच्या बाबतीत बड्या उद्योगपतींनाही मागे टाकले
Top 5 Fashion Designers of Bollywood : बॉलिवूड चित्रपटांतील कलाकार आपल्या दमदार अभिनयासह त्यांच्या लूक्समुळेही चर्चेत येतात. त्यांचे लूक डिझाईन करण्यात फॅशन डिझायनरचा महत्त्वाचा रोल असतो. जाणून घ्या बॉलिवूडच्या 'टॉप 5' फॅशन डिझायनरबद्दल...
Top 5 Fashion Designers : बॉलिवूड (Bollywood) सिनेसृष्टीतील कलाकार आपल्या दमदार अभिनयासह आपल्या हटके लूक्समुळेही चर्चेत असतात. त्यांच्या लूक्सची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ निर्माण होते. या कलाकारांचं सौंदर्य खुलवण्यात मेकअप आर्टिस्टसह फॅशन डिझायनरचाही (fashion Designers) मोठा रोल असतो. हे फॅशन डिझायनर सेलिब्रिटींसह देशालाही रिप्रेझेंट करतात. त्यांनी डिझाइन केलेल्या कपड्यांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. अनेक फॅशन डिझायनरने मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींची संपत्ती निर्माण केली आहे. हे फॅशन डिझायनर बॉलिवूडसह हॉलिवूड कलाकारांच्या कपड्यांचं डिझाइन बनवताना दिसून येतात. जाणून घ्या बॉलिवूडच्या टॉप 5 फॅशन डिझानरबद्दल...
'हे' आहेत बॉलिवूडचे 'TOP 5' फॅशन डिझायनर
रितु कुमार : लोकप्रिय फॅशन डिझायनर रितु कुमार एक लोकप्रिय महिला फॅशन डिझायनर आहे. भारतीय संस्कृतीला नवं रुप देण्यासोबत आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोलकातासारख्या शहरातून तिने 50 हजरांमध्ये या बिझनेसची सुरुवात केली. रितु आज एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्तीची मालकीण आहे. रितु कुमारने माधुरी दीक्षित, दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय, कृती सेनन, तापसी पन्नू आणि विद्या बालन सारख्या अभिनेत्रींचे कपडे डिझाईन केले आहेत. तसेच ब्रिटनची राजकुमारी प्रिंसेस डायनाही रितु कुमारने डिझाईन केलेल्या कपड्यांची फॅन होती.
अनामिका खन्ना : सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अनामिका खन्ना बॉलिवूड फॅशनिस्टा सोनम कपूरच्या आवडत्या डिझायनरपैकी एक आहे. अनामिका आधी भारतीय डिझायनर आहे. अनामिकाकडे 'एना-मिका' हे इंटरनॅशनल लेबल आहे. अनामिकला आपल्या डिझाईनमध्ये रॉयल टच आणायला आवडतो. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींसह अंबानी कुटुंबातील महिलांपर्यंत सर्वांनाच तिने डिझाईन केलेले कपडे परिधान करायला आवडतात. अनामिका खन्ना आजच्या घडीला 600 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.
मनीष मल्होत्रा : बॉलिवूडचा लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने फॅशनच्या विश्वात मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. आज तो एक लोकप्रिय फॅशन डिझायनर आहे. अनेक वर्षांपासून मनीष बॉलिवूड सेलिब्रिटींचे कपडे डिझाईन करत आहे. तसेच मायकल जॅक्सन, जीन-क्लाउड वैन डेम, रीज विदरस्पून आणि काइली मिनोग सारख्या हॉलिवूड कलाकारांसोबतही मनीषने काम केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मनीष मल्होत्रा जवळपास 300 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.
सब्यसाची मुखर्जी : ग्लॅमरस जगात जेव्हा भारतीय फॅशन डिझायनरचा नाव घेतलं जातं तेव्हा सब्यसाची मुखर्जीचं नाव हमखास घेतलं जातं. सब्यसाची मुखर्जी आपल्या शानदार वेडिंग कलेक्शनसाठी ओळखले जातात. अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ आणि दीपिका पादुकोणसारख्या बॉलिवूड अभिनेत्रींचे कपडे सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केले आहेत. फायनेंशियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, सब्यसाची मुखर्जी आज 115 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.
मसाबा गुप्ता : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता एक लोकप्रिय फॅशन डिझायनर आहे. अभिनयक्षेत्रात काम करण्याचं स्वप्न असणाऱ्या मसाबाने अचानक फॅशनच्या जगात पाऊल ठेवलं आहे. मसाबा गुप्ताची नेटवर्थ 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
संबंधित बातम्या