Shah Rukh Khan : शाहरुखचा जावई व्हायचंय? सुहानाच्या बॉयफ्रेंडसाठी किंग खानने ठेवलायत 'या' 7 अटी; लिस्ट वाचून तुम्हीही व्हाल अवाक्
Suhana Khan Birthday : शाहरुख खानने लेक सुहानाच्या बॉयफ्रेंडसाठी खास नियम ठेवले आहेत. शाहरुखने स्वत: एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
Suhana Khan Birthday : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचं (Shah Rukh Khan) आपली लाडकी लेक सुहाना खानवर (Suhana Khan) खूप प्रेम आहे. शाहरुखच्या पावलावर पाऊल ठेवत सुहानानेही अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तिने जोया अख्तरच्या (Zoya Akhtar) 'द आर्चीज' (The Archies) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. शाहरुख खान आपली लेक सुहानाच्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह आहे. या बापलेकीच्या जोडीला एकत्र पाहून चाहत्यांना नेहमीच आनंद होत असतो. सुहाना आणि शाहरुखचे एकत्र असलेले अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. शाहरुख सुहानाच्या व्यावसायिक कामासह वैयक्तिक आयुष्याबाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह आहे. शाहरुखने एकदा एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याने सुहानाच्या होणाऱ्या बॉयफ्रेंडसाठी खास अटी ठेवल्या आहेत.
शाहरुख खानने सुहानाच्या होणाऱ्या बॉयफ्रेंडसाठी काही खास अटी ठेवल्या आहेत. एका मुलाखतीत शाहरुखने यावर भाष्य केलं आहे. फेमिना या मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख म्हणाला होता की, त्याने सुहानाच्या होणाऱ्या बॉयफ्रेंडसाठी सात नियम ठेवले आहेत. शाहरुख खान आपल्या लेकीसाठी किती प्रोटेक्टिव्ह आहे हे तुम्हाला हे नियम जाणून घेतल्यानंतर अंदाज येईल.
सुहानाच्या बॉयफ्रेंडसाठी शाहरुखने ठेवलेत 'हे' नियम (Shah Rukh Khan Laid Down 7 Rules for Suhana Khan Future Boyfriend)
1. चांगला जॉब शोधणं
2. तू मला आवड नाहीस असं समज
3. मी प्रत्येक ठिकाणी आहे.
4. एक वकील कर
5. ती माझी प्रिंसेस आहे तुझं जिंकणं नाही.
6. मला पुन्हा तुरुंगात जायला काही अडचण नाही
7. तू जे सुहानासोबत करशील ते मी तुझ्यासोबत करेल.
शाहरुख खान एका मुलाखतीत म्हणाला होता की एक दिवस असा येईल जेव्हा मला लेकीच्या कोणासोबतच्या फीलिंग्सचा स्विकार करावा लागेल. सुहाना खान लवकरच शाहरुख खानसोबत काम करताना दिसणार आहे. 'किंग' (King) असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. सुजॉय घोण या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे.
सुहाना खान कोणाला डेट करतेय?
शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान (Suhana Khan) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदाला (Agastya Nanda) डेट करत असल्याची चर्चा आहे. 'द आर्चीज' या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याचं म्हटलं जातं. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या