Sudipto Sen On The Kerala Story: 'द केरळ स्टोरी'ला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावर दिग्दर्शकांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'हे मला माहित होतं...'
'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
Sudipto Sen On The Kerala Story: अभिनेत्री अदा शर्माचा (Adah Sharma) चित्रपट 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आता दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी चित्रपटाला मिळणाऱ्या या जबरदस्त प्रतिसादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सांगितले की त्याच्याकडे आणखी कथा आहेत, ज्या त्यांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत.
एका मुलाखतीमध्ये सुदीप्तो सेन यांनी सांगितलं, 'मी खूप आनंदी आहे. माझ्याकडे अजून खूप कथा आहेत ज्या मला लोकांना सांगायच्या आहे. लोकांनी खूप कौतुक केल्यानंतर मला विश्रांती घ्यायची नाही. हा चित्रपट यशस्वी होणार हे मला माहित होतं. मी या चित्रपटावर सात वर्षे काम केले आहे.'
सुदीप्तो सेन यांना मुलाखतीत विचारण्यात आले की, बरेच लोक विचारत आहेत की 'द केरळ स्टोरी'ची कथा केवळ महिलांबद्दल का आहे, पुरुषांबद्दल का नाही? याला उत्तर देताना दिग्दर्शक म्हणाला, 'ही सुरुवातीपासूनच तीन मैत्रिणींची कथा होती. याबाबत कोणतीही पूर्वनियोजित रणनीती नव्हती. आता काही निर्मात्यांनी पुरुषांच्या कट्टरतावादावर द केरळ स्टोरीचा सिक्वेल म्हणून एक प्रोजेक्ट ऑफर केला आहे.'
View this post on Instagram
अदाच्या द केरळ स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
'द केरला स्टोरी'नं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 2023 मध्ये 'पठाण', 'तू झुठी में मकर', 'किसी का भाई किसी की जान' नंतरचा 'द केरळ स्टोरी' हा चौथा चित्रपट आहे, ज्याने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: