Swatantra Veer Savarkar : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाने तीन दिवसांत किती कोटी कमावले? जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
Swatantra Veer Savarkar : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी खास कमाई करू शकलेला नाही. पण वीकेंडला हा सिनेमा जास्त कमाई करू शकलेला नाही. रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 6 कोटींची कमाई केली आहे.
Swatantra Veer Savarkar Box Office Collection Day 3 : स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या आयुष्यावर आधारित रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या बहुप्रतीक्षित सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता हा सिनेमा रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत या सिनेमाने सहा कोटींची कमाई केली आहे. सध्या सर्वत्र या सिनेमाचीच चर्चा सुरू आहे.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा बायोपिक आहे. 22 मार्च 2024 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. पण वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Swatantra Veer Savarkar Box Office Collection Day 3)
'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा बहुचर्चित चित्रपट 22 मार्च 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तरण आदर्शने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.10 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत वाढ झाली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 2.25 कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी 2.75 कोटींचं कलेक्शन जमवलं. एकंदरीत रिलीजच्या तीन दिवसांत 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाने 6.10 कोटींचा गल्ला जमवला आहे.
- पहिला दिवस : 1.10 कोटी
- दुसरा दिवस : 2.25 कोटी
- तिसरा दिवस : 2.75 कोटी
- एकूण कमाई : 6.10 कोटी
'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी रणदीप हुड्डाने घटवलं 32 किलो वजन
'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने खूप मेहनत घेतली आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असण्यासोबत त्याने दिग्दर्शनेखील केलं आहे. दिग्दर्शक म्हणून रणदीपचा हा पहिलाच चित्रपट आहे. रणदीपने या सिनेमात स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने 32 किलो वजन घटवलं आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत रणदीपने स्वत:चा याचा खुलासा केला आहे.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची तगडी स्टारकास्ट
मीडिया रिपोर्टनुसार, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाची निर्मिती 20 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि लीजेंड स्टुडिओज यांनी केली आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमात रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) मुख्य भूमिकेत आहेत. अंकिताने या सिनेमात सावरकरांची पत्नी यमुनाबाईंची भूमिका वठवली आहे. तसेच अमित सियालदेखील या सिनेमाचा भाग आहेत.
संबंधित बातम्या