Surekha Sikri Passes Away : तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रख्यात अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन
Surekha Sikri Death: 'बालिका वधु' मालिकेतील आणि 'बधाई हो' या चित्रपटातील सुरेखा सिक्री यांची भूमिका कायम लक्षात राहते. आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे.
![Surekha Sikri Passes Away : तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रख्यात अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन Surekha Sikri death Veteran actress TV show Balika Vadhu passed away at age 75 cardiac arrest Surekha Sikri Passes Away : तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रख्यात अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/16/a172ef92c58d4f4208ab2ba889c3c842_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : प्रख्यात अभिनेत्री आणि टीव्ही मालिकेतील एक मोठं नाव असलेल्या सुरेखा सिक्री यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. गेल्या वर्षी त्यांना ब्रेन स्ट्रोकच्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं.
सुरेखा सिक्री यांना त्यांच्या अभिनयासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'बालिका वधु' सारख्या मालिकेत त्यांची भूमिका आजही लक्षात राहते. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. आयुषमान खुराना प्रमुख भूमिकेत असलेल्या 'बधाई हो' या चित्रपटातील सुरेखा सिक्री यांची भूमिका विशेष लक्षात राहते.
सुरेखा सिक्री यांना या आधीही 2018 साली पहिल्या ब्रेन स्ट्रोकला सामोरं जावं लागलं होतं. गेल्या वर्षी त्यांना दुसरा ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांची तब्बेत गुंतागुंतीची झाली होती. त्यामुळे त्यांचं आजारपण बळावलं. आज सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
Mumbai: Three-time national award-winning veteran actress Surekha Sikri passes away following a cardiac arrest earlier this morning. She was 75 years old. pic.twitter.com/QSumOrKECb
— ANI (@ANI) July 16, 2021
सुरेखा सिक्री यांचे बालपण अल्मोरा आणि नैनिताल या ठिकाणी गेलं. त्यांचे वडील एअर फोर्ममध्ये होते तर आई या शिक्षिका होत्या. सुरेखा सिक्री यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतला. सुरेखा सिक्री यांना 1989 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे. सुरेखा सिक्री यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Corona Update : गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 38,949 नवे रुग्ण तर 542 जणांचा मृत्यू
- Tokyo Olympic 2020 : ठरलं! टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार नोवाक जोकोविच; ट्वीट करत दिली माहिती
- रद्द झालेल्या IT Act 66 A नुसार नोंद केलेले सर्व गुन्हे मागे घ्या; सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)