Corona Update : गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 38,949 नवे रुग्ण तर 542 जणांचा मृत्यू
India Coronavirus Cases : देशातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या कमी होत असून याबाबतीत आता भारताचा जगात सहावा क्रमांक लागतोय.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाची रुग्णसंख्या 40 हजारांच्या आसपास येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आज देशात 38,949 कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 542 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत देशात 40,026 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गुरुवारी 41,806 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 581 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
India reports 38,949 new #COVID19 cases, 40,026 recoveries, & 542 deaths in the last 24 hours, as per Health Ministry
— ANI (@ANI) July 16, 2021
Total cases: 3,10,26,829
Total recoveries: 3,01,83,876
Active cases: 4,30,422
Death toll: 4,12,531
Total vaccinated: 39,53,43,767 (38,78,078 in last 24 hrs) pic.twitter.com/9vdgx85O3j
देशात सध्या चार लाखांहून जास्त सक्रिय रुग्णसंख्या आहे तर चार लाख 30 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहे. देशात आतापर्यंत चार लाख 12 हजार 531 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत एकूण तीन कोटी एक लाख 83 हजार लोक कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत तीन कोटी 10 लाख 26 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 39 कोटी 53 लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1.33 टक्के आहे तर रिकव्हरी दर हा 97 टक्के इतका आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. आज 8,010 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 52 हजार 440 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 टक्के आहे.
राज्यात आज 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 31 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 7 हजार 205 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदुरबार (70), हिंगोली (71), यवतमाळ (23), गोंदिया (66), चंद्रपूर (22) या पाच जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 17, 401 सक्रिय रुग्ण आहेत. जळगाव, परभणी, जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 979 रुग्णांची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- रद्द झालेल्या IT Act 66 A नुसार नोंद केलेले सर्व गुन्हे मागे घ्या; सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश
- Tokyo Olympic 2020 : ठरलं! टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार नोवाक जोकोविच; ट्वीट करत दिली माहिती
- Gold Silver Price Today : सोनं 400 तर चांदी 300 रुपयांनी महाग; जाणून घ्या आजचे दर