Suhana Khan : शाहरुख खानच्या लेकीचा रुमर्ड बॉयफ्रेंड अगस्त्य नंदासोबत फोटो व्हायरल, बिग बींच्या नातवासाठी सुहानाची खास पोस्ट चर्चेत
Suhana Khan Rumored Boyfriend : सुहाना खानचा रुमर्ड बॉयफ्रेंड अगस्त्य नंदा सोबतचा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
Suhana Khan and Agastya Nanda Photo Viral : बॉलिवूडच्या 'किंग' शाहरुख खानची लेक अलिकडे तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणामुळे चर्चेत आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिच्या बॉयफ्रेंडच्या नावाची चर्चा आहे. सुहाना खान हिचं नाव सध्या बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्यासोबत जोडलं जात आहे. सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. सुहाना खानचा रुमर्ड बॉयफ्रेंड अगस्त्य नंदा याच्यासोबतचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
शाहरुख खानच्या लेकीच्या रुमर्ड बॉयफ्रेंडची चर्चा
शाहरुख खानची मुलगी सुहानाने रुमर्ड बॉयफ्रेंड अगस्त्य नंदासोबत अनसीन फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने तिचा बॉयफ्रेंड अगस्त्य नंदाला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या. सुहाना खानने सोशल मीडियावर अगस्त्य नंदासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती त्याचे कान ओढताना दिसत आहे.
अगस्त्यचा कान ओढताना दिसली सुहाना
हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना सुहानाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा" आणि एक मजेदार इमोजी देखील पोस्ट केला आहे. फोटोमध्ये सुहाना हसताना आणि अगस्त्यचा कान ओढताना दिसत आहे. फोटोमध्ये अगस्त्यही डोळे मिटून हसताना आणि एन्जॉय करताना दिसत आहे. या फोटोमध्ये सुहानाने काळ्या रंगाचा गाऊन घातला असून अगस्त्य काळ्या तपकिरी रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.
सुहाना खानची अगस्त्य नंदासाठी खास पोस्ट
चित्रपटात एकत्र झळकले सुहाना-अगस्त्य
सुहाना खान आणि अगस्त्य नंदा 'द आर्चीज' चित्रपटामध्ये एकत्र झळकले आहे. या चित्रपटात खुशी कपूर, युवराज मेंडा, वेदांग रैना, मिहिर आहुजा आणि आदिती सैगल हे ही मुख्य भूमिकेत दिसले. सुहाना खान लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. सुहाना खान शाहरुख खानसोबत 'किंग' या चित्रपटात दिसणार आहे. 'द आर्चीज' चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता, त्यामुळे थिएटरमध्ये रिलीज होणारा सुहानाचा हा पहिला चित्रपट असून ती यातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
View this post on Instagram