Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' निरोपाचे क्षण जवळ येताच 'अरुंधती' सह सर्व कलाकार भावूक, डोळ्यात पाणी अन् कडकडून मिठी
Aai Kuthe Kay Karte Serial : 'आई कुठे काय करते' मालिकेच्या निरोपाचे क्षण जवळ येताच सेटवरील सर्व कलाकार भावूक झाले. सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्याचं पाहायला मिळालं.
![Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' निरोपाचे क्षण जवळ येताच 'अरुंधती' सह सर्व कलाकार भावूक, डोळ्यात पाणी अन् कडकडून मिठी Aai Kuthe Kay Karte cast got Emotional on last day of shoot tv Serial arundhati shreaded tears marathi news Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' निरोपाचे क्षण जवळ येताच 'अरुंधती' सह सर्व कलाकार भावूक, डोळ्यात पाणी अन् कडकडून मिठी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/24/19befd971a214813aa9ac69cdcc74c321732466407242322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aai Kuthe Kay Karte : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका तब्बल पाच वर्षांच्या यशस्वी प्रवासानंतर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेच्या अखेरच्या भागाचं नुकतंच शुटींग पार पडलं आहे. मालिकेचा अखेरचा भाग शूट करताना सर्वच कलाकारांच्या डोळ्यात पाणी आलं. इतकंच काय तर सेटवरील स्पॉट बॉयपासून ते दिग्दर्शकापर्यंत सेटवरील प्रत्येक माणूस भावूक झाला होता. मालिकेचा प्रवास आता संपणार असल्याने मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, त्यासोबत मालिकेतील कलाकारांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा लागणार आहे.
'आई कुठे काय करते'चा निरोप घेताना कलाकार भावूक
'आई कुठे काय करते' मालिका टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. या मालिकेसोबत मोठा चाहतावर्ग जोडला गेला होता. ही मालिका पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती, आता मालिकेच्या निरोपाची वेळ झाली आहे. 30 नाव्हेंबरला मालिकेचा अखेरचा भाग प्रसारित होणार असला, तरी मालिकेच्या अखेरच्या भागाचं शूटींग पूर्ण झाला आहे.
डोळ्यात पाणी अन् कडकडून मिठी
सेटवरील शेवटच्या दिवशी सर्वांचा कंठ दाटून आला. 'आई कुठे काय करते' मालिकेच्या निरोपाचे क्षण जवळ येताच सेटवरील सर्व कलाकार भावूक झाले. सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्याचं पाहायला मिळालं.
सेटवर उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी
स्टार प्रवाहवर 2019 मध्ये सुरु झालेली आई कुठे काय करते ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आई कुठे काय करते ही मालिका येत्या 30 नोव्हेंबरपासून ऑफ एअर जाईल. भरभरुन प्रेम मिळाल्यानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
View this post on Instagram
प्रेक्षकांप्रमाणेच कलाकारांनाही मालिकेची सांगता होतेय, याची हुरहुर आहे. यामुळेच शुटींगच्या अखेरच्या दिवशी 'आई कुठे काय करते' मालिकेच्या शुटींगच्या शेवटच्या दिवशी सेटवर उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी होतं.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)