एक्स्प्लोर

Kanguva : सूर्या आणि बॉबी देओलच्या 'कंगुवा' चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा, आलिया भटच्या या चित्रपटासोबत क्लॅश होणार

Kanguva Release Date : साऊथ सुपरस्टार सूर्याचा बहुप्रतिक्षित 'कंगुवा' चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात बॉबी देओल खलनायकाच्या रुपात दिसणार आहे.

मुंबई : साऊथ सुपरस्टार सूर्याचा (Actor Suriya) बहुप्रतिक्षित 'कंगुवा' चित्रपट (Kanguva Movie) गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात बॉबी देओल (Bobby Deol) खलनायकाच्या भूमिकेत (Villian) दिसणार आहे. आश्रम वेब सीरिजमुळे बॉबी देओलच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची प्रतीक्षा लागून आहे. आता कंगुवा चित्रपटाची रिलीज डेट (Kanguva Release Movie Date) जाहीर झाली आहे. बहुप्रतिक्षित कंगुवा चित्रपट 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान हा चित्रपट आणखी एका चित्रपटासोबत क्लॅश होणार आहे.

सूर्या आणि बॉबी देओलच्या 'कंगुवा' चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा

साऊथ व्यतिरिक्त हिंदी प्रेक्षकांमध्येही सूर्याचा मोठा चाहतावर्ग आहे. कंगुवा चित्रपटात बॉबी देओलही खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात बॉबी देओलचं आक्राळ-विक्राळ दैत्याकार रूप पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे 'लॉर्ड' बॉबीचे चाहतेही या चित्रपटाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. 'कंगुवा' बिग बजेट दक्षिणात्य चित्रपटांपैकी एक आहे. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी कंगुवा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख अखेर जाहीर केली आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर कंगुवा चित्रपट प्रदर्शित होणार

कंगुवा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. अभिनेता सूर्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर अकाऊंटवरु एक पोस्ट शेअर करत याबाबतची अपडेट दिली आहे. या चित्रपटाचं एक पोस्टर त्याने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये सूर्या एका हातात तलवार घेऊन उभा आहे. यावर्षी दसऱ्याच्या (Dasara) मुहूर्तावर कंगुवा चित्रपट  10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री दिशा पटानी देखील या चित्रपटात झळकणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suriya Sivakumar (@actorsuriya)

आलिया भट्टच्या चित्रपटाशी टक्कर होणार

दसऱ्याच्या (Dussehra) मुहूर्तावर आलिया भटचा (Alia Bhatt) 'जिगरा' चित्रपट (Jigra Movie Release Date) प्रदर्शित होणार आहे. 'कंगुवा' चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 ऑक्टोबरला 'जिगरा' चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शानाची धुरा वासन बाला यांच्याकडे आहे. या चित्रपटात आलियासोबत वेदांग रैनाही दिसणार आहे. यापूर्वी ‘जिगरा’ 27 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, नंतर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. आता सूर्याचा 'कंगुवा' आणि आलियाचा 'जिगरा' या दोन चित्रपटात बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार असून यामध्ये कोण बाजी मारते हे पाहावं लागणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kalki 2898 AD चित्रपटाचं बजेट 600 कोटी; एकट्या प्रभासचं मानधन बिग बी, दीपिका आणि इतरांपेक्षा जास्त

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Vajale Ki Bara Song: ''वाजले की बारा'साठी मी पहिली पसंती नव्हते...'; अमृता खानविलकरचा खुलासा, चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
''वाजले की बारा'साठी मी पहिली पसंती नव्हते...'; अमृता खानविलकरचा भुवया उंचावणारा खुलासा
Devdatta Nage Ghabadkund Look: डोळ्यांत अंगार अन् चेहऱ्यावर रहस्यमयी भाव; 'खंडोबा' साकारणाऱ्या देवदत्त नागेच्या नव्या लूकनं वाढवली उत्सुकता PHOTO
डोळ्यांत अंगार अन् चेहऱ्यावर रहस्यमयी भाव; 'खंडोबा' साकारणाऱ्या देवदत्त नागेच्या नव्या लूकनं वाढवली उत्सुकता PHOTO
Salman Khan Warns Paparazzi: मध्यरात्री 3 वाजता रुग्णालयापर्यंत पाठलाग, पॅपाराझींचा घोळका दिसताच सलमान खान प्रचंड चिडला, म्हणाला, 'साठीचा झालोय पण आजही 100 जणांना लोळवेन'
मध्यरात्री 3 वाजता रुग्णालयापर्यंत पाठलाग, पॅपाराझींचा घोळका दिसताच सलमान खान प्रचंड चिडला, म्हणाला, 'साठीचा झालोय पण आजही 100 जणांना लोळवेन'
Govinda Broken Tooth Look Video: गोविंदाचा दात तुटलेला व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना वेगळाच संशय, म्हणाले, 'त्याला बायकोनं मारलंय...'
गोविंदाचा दात तुटलेला व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना वेगळाच संशय, म्हणाले, 'त्याला बायकोनं मारलंय...'

व्हिडीओ

PM Narendra Modi Meet Melony in Italy | वेलकम टू रोम, माय फ्रेंड! मोदींसोबत गप्पा, जॉर्जिया मेलोनींची पोस्ट
Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Giorgia Meloni 'Melody' Moment : PM मोदींनी मेलोडी चॉकलेट्स देताच मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या...; जगभरात व्हिडीओची चर्चा
PM मोदींनी मेलोडी चॉकलेट्स देताच मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या...; जगभरात व्हिडीओची चर्चा
Donald Trump: अखेर बेलगाम झालेल्या ट्रम्पचे पंख स्वत:च्या पक्षाच्या चार खासदारांनीच छाटले; इराण युद्ध थांबवण्याचा ठराव अमेरिकी काँग्रेसमध्ये अखेर मंजूर; 5 मोठ्या घडामोडी
बिग ब्रेकिंग! अखेर बेलगाम झालेल्या ट्रम्पचे पंख स्वत:च्या पक्षाच्या चार खासदारांनीच छाटले; इराण युद्ध थांबवण्याचा ठराव अमेरिकी काँग्रेसमध्ये अखेर मंजूर; 5 मोठ्या घडामोडी
पंतप्रधान, गृहमंत्री गद्दार, आपल्या भारताला विकण्याचं काम केलं; आर्थिक वादळं येणार, मोदी पुन्हा रडायचं काम करतील आणि माझी चुकी नाही म्हणतील; राहुल गांधींचा प्रहार
पंतप्रधान, गृहमंत्री गद्दार, आपल्या भारताला विकण्याचं काम केलं; आर्थिक वादळं येणार, मोदी पुन्हा रडायचं काम करतील आणि माझी चुकी नाही म्हणतील; राहुल गांधींचा प्रहार
देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं 'कॉकरोच जनता पार्टी'च सुरु केली! अभिजित दीपके आहे तरी कोण?
देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं 'कॉकरोच जनता पार्टी'च सुरु केली! अभिजित दीपके आहे तरी कोण?
Who is Gurnoor Brar: उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
NCP Prabodh Davkhare: डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
NCP Prabodh Davkhare: डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Ajit Agarkar on Mohammed Shami: 'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
Rahul Gandhi and PM Modi: भारताच्या डोक्यावर आर्थिक वादळ घोंघावतय अन् आपले पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; राहुल गांधींची बोचरी टीका
भारताच्या डोक्यावर आर्थिक वादळ घोंघावतय अन् आपले पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; राहुल गांधींची बोचरी टीका
Embed widget