Sonu Sood : सोनू सूदने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस; गरजूंना मदत करण्याचे दिले आश्वासन
Sonu Sood : अभिनेता सोनू सूदने 49 वा वाढदिवस चाहत्यांसोबत साजरा केला आहे.
Sonu Sood : अभिनेता सोनू सूदचा (Sonu Sood) आज 49 वा वाढदिवस आहे. सोनूने त्याचा वाढदिवस चाहत्यांसोबत साजरा केला आहे. सोनू दुबईत एका सिनेमाचे शूटिंग करत होता. पण वाढदिवशी त्याने मुंबई गाठली. सोनू मुंबईतील अंधेरी येथील ओशिवरा भागात राहतो. सोनूच्या वाढदिवशी त्याच्या घराबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती.
सोनू सूदने वाढदिवशी गरजू मंडळींना मदत करण्याचे आश्वासन दिले. सोनूला भेटण्यासाठी 80 पेक्षा अधिक वय असलेल्या एक आजीदेखील आल्या होत्या. त्या सोनूला भेटल्या आणि त्याला आशीर्वाद दिला. तसेच समाजसेवा सुरू ठेवण्याचा सल्लादेखील दिला.
सोनू सूदसाठी चाहत्यांनी विविध गोष्टींची भेट आणली होती. कुणी फुलांचा गुच्छ आणला होता, कुणी केक आणला होता. त्यामुळे वाढदिवशी सोनूने अनेक केक कापले. सोनूला भेटल्यानंतर चाहते 'सोनू भैया, सोनू भैया', 'सोनू सूद, जिंदाबाद-जिंदाबाद', 'अगला नेता कैसा हो, सोनू सूद जैसा हो' अशा घोषणा करत होते.
View this post on Instagram
सोनू सूद एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला,"माझे चाहते माझी वाट पाहत असतील याचा मला अंदाज होता. त्यामुळेच मी दुबईतील शूटिंग संपवून घरी आलो आहे. चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. ही माझी सर्वात मोठी कमाई आहे. लहानपणी मी माझा वाढदिवस माझ्या कुटुंबासोबत साजरा करायचो, पण आता चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा करतो आहे. हा एक वेगळा अनुभव आहे".
संबंधित बातम्या
Sonu Sood Birthday: खिशात 5000 रूपये घेऊन आला होता मुंबईत, आज कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या 'रिअल लाईफ हिरो' सोनू सूदबाबत
Sonu Sood : कोरोनाकाळात केलेल्या विशेष कार्याबद्दल सोनू सूदचा 'आयएए विशेष पुरस्कारा'ने सन्मान
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
