Chakda Xpress : अनुष्का शर्माच्या 'चकदा एक्सप्रेस' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; झुलन गोस्वामींची भूमिका साकारणार
Anushka Sharma Chakda Xpress : अनुष्का शर्माने तिच्या आगामी 'चकदा एक्सप्रेस' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
Anushka Sharma Shoot Begins Chakda Xpress : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनुष्काचा 'चकदा एक्सप्रेस' (Chakda Xpress) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुष्काने आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अनुष्का ‘झिरो’ सिनेमात शेवटची दिसली होती. अनुष्काने मुलीच्या जन्मानंतर काही वर्ष सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. पण 'चकदा एक्सप्रेस' या सिनेमाच्या माध्यमातून अनुष्का आता कमबॅक करणार आहे.
'चकदा एक्सप्रेस' हा क्रीडा विषयक सिनेमा आहे. या सिनेमात अनुष्का वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामींच्या (Jhulan Goswami) भूमिकेत दिसणार आहे. अनुष्काने सोशल मीडियावर 'चकदा एक्सप्रेस' सिनेमाच्या सेटवरचे फोटो शेअर केले आहेत. सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्याआधीच अनुष्काने सिनेमावर काम करायला सुरुवात केली आहे. या सिनेमासाठी अनुष्का खूप मेहनत घेत आहे.
'चकदा एक्सप्रेस' हा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांचा बायोपिक आहे. या सिनेमासाठी अनुष्काने खूप मेहनत घेतली आहे. अनुष्काचे ट्रेनिंग दरम्यानचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनुष्काच्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार ‘चकदा एक्सप्रेस’
‘चकदा एक्सप्रेस’ हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. झूलन गोस्वामी या एक वेगवान गोलंदाज आहेत. अनुष्काच्या चकदा एक्सप्रेस या सिनेमाचे शूटिंग भारताबरोबरच यूकेमध्ये देखील होणार आहे. या सिनेमाची निर्मीती अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसने म्हणजेच क्लीन स्लेट फिल्म यांनी केली आहे. या प्रोडक्शन हाऊसने ‘एनएच 10’ आणि ‘परी’ या चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे. अनुष्का आता यातून बाहेर पडली असली तरी तिचा भाऊ सध्या प्रोडक्शन हाऊसचे काम सांभाळतो.
संबंधित बातम्या