Anushka Sharma Chakda ‘Xpress : अनुष्काचं बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन; चकदा एक्सप्रेसमधील लूकनं वेधलं लक्ष
चकदा एक्सप्रेस (Chakda ‘Xpress) या चित्रपटाची घोषणा अनुष्का शर्माने ( Anushka Sharma ) केली आहे.
Anushka Sharma Chakda ‘Xpress : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करते. 2017 मध्ये अनुष्कानं क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये 11 जानेवारी रोजी मुलगी वामिकाला जन्म दिला. गेली काही वर्ष अनुष्का शर्मानं चित्रपटातून ब्रेक घेतला होती. आता अमुष्काने बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. चकदा एक्सप्रेस (Chakda ‘Xpress) या चित्रपटाची अधिकृत घोषणा करत अनुष्काने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट महिला क्रिकेटर झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे.
चकदा एक्सप्रेस हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अनुष्काने शेअर केलेल्या व्हिडीओमधील तिच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे. झूलन गोस्वामी या एक फास्ट बॉलर आहेत.
View this post on Instagram
अनुष्काच्या चकदा एक्सप्रेस या चित्रपटाचे शूटिंग भारताबरोबरच यूकेमध्ये देखील होणार आहे. या चित्रपटाची निर्मीती अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसने म्हणजेच क्लीन स्लेट फिल्मझ यांनी केली आहे. या प्रोडक्शन हाऊसने एनएच 10 आणि परी या चित्रपटांची देखील निर्मीती केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Deepika Padukone : ...म्हणून शूटिंग सेटवर दीपिका घेऊन जाते रंगीत पेन्सिल बॉक्स!
Ankita Lokhande : डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला अंकिताचा रॉयल लेहेंगा; 1600 तास सुरु होतं काम
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह