एक्स्प्लोर

सलमान खान दरवर्षी सरकारला किती कर भरतो? टॅक्स भरण्यामध्ये बॉलिवूडचा 'किंग' कोण?

Salman Khan Tax: बॉलिवूडचा दबंग म्हणजे, सलमान खान. जो त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असतो. पण, तो तेवढा टॅक्सही भरतो...

Salman Khan Tax: बॉलिवूडचा (Bollywood) भाईजान सलमान खान (Salman Khan) दरवर्षी आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन चित्रपट घेऊन येतो. त्यात ईदची ईदी तर ठरलेलीच. पण भाईजान केवळ चाहत्यांना दमदान चित्रपटांची मेजवानीच देत नाहीतर आपलं कर्तव्यही पार पाडतो. भाईजान वेळच्यावेळी केंद्र सरकारकडे आपल्या वाट्याचा टॅक्स भरतो. सलमान खान आपल्या चित्रपटांमधून कोट्यवधींची कमाई करतो. सध्या सुरू असलेलं बिग बॉस होस्ट करण्यासाठी सलमान खान कोट्यवधींचं मानधनही घेतो. पण, तो सर्वाधिक टॅक्सही भरतो. सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत सलमान खान यंदा तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

सलमान खान किती टॅक्स भरतो?

बॉलिवूडचा दबंग म्हणजे, सलमान खान. जो त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असतो. पण आज आम्ही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नाहीतर, तो केंद्र सरकारकडे किती टॅक्स भरतो, याबाबत सांगणार आहोत. सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत सलमान तिसऱ्या क्रमांकावर आहे. सलमान खाननं यावर्षी 75 कोटी रुपयांचा कर भरला आहे. 

सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी कोण?

80 कोटींचा कर भरणारा साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत शाहरुख खान 92 कोटींचा कर भरून पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत बिग बी अमिताभ बच्चन 71 कोटींचा कर भरून चौथ्या स्थानावर आहेत, तर अजय देवगण 42 कोटींचा कर भरून पाचव्या स्थानावर आहेत. 'अॅनिमल' सारखा बंपर हिट चित्रपट देणाऱ्या रणबीर कपूरनं यावर्षी 36 कोटींचा कर भरला आहे.

हृतिक रोशननं यावर्षी 28 कोटी रुपयांचा कर भरला असून तो या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. कॉमेडी किंग कपिल शर्माचाही सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत समावेश आहे. कपिल शर्माने यावर्षी 26 कोटी रुपयांचा कर भरला आहे.

दरम्यान, सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान सध्या बिग बॉस 18 होस्ट करताना दिसत आहे. याशिवाय तो 'सिकंदर' या चित्रपटाचं शूटिंगही करत आहे, ज्याचं पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं.

बिश्नोई गँगच्या निशाण्यावर सलमान

काही दिवसांपूर्वी सलमान खानचे घनिष्ट मित्र आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तेव्हापासूनच सलमान खान चर्चेत आला आहे. सध्या बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असलेला सलमान खान भलताच चर्चेत आहे. सलमानच्या काळविट शिकार प्रकरणामुळे काळविटाला परमेश्वर मानणारं, त्याची पूजा करणारा बिश्नोई समाज त्याच्यावर नाराज आहे. याच कारणामुळे तो सध्या बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

क्लायमॅक्समध्ये मोठा ट्वीस्ट, संपूर्ण फिल्ममध्ये भरभरुन सस्पेन्स; शेवटच्या 5 मिनिटांत हादरुन जाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
Shekhar Kumar Yadav : देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
आठवड्यातून 3 दिवस सुट्टी, 4 दिवस काम; सरकार रोमान्स करण्यासाठी देतंय सुट्टी
आठवड्यातून 3 दिवस सुट्टी, 4 दिवस काम; सरकार रोमान्स करण्यासाठी देतंय सुट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Patil on Parbhani Protest :  परभणीतील आंदोलनाला हिंसक वळणYogesh Tilekar Mama : वैयक्तिक कारणातून सतिश वाघ यांचा जीव घेतलाAmbadas Danve PC : विरोधी पक्षनेते पद ते लाडकी बहीण योजना! अंबादास दानवेंची सविस्तर प्रतिक्रियाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
Shekhar Kumar Yadav : देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
आठवड्यातून 3 दिवस सुट्टी, 4 दिवस काम; सरकार रोमान्स करण्यासाठी देतंय सुट्टी
आठवड्यातून 3 दिवस सुट्टी, 4 दिवस काम; सरकार रोमान्स करण्यासाठी देतंय सुट्टी
Mukhyamantri Sahayata Nidhi: एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
Jayant Patil: इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
Embed widget