Prabhas : काळं शर्ट, लुंगी अन् बरचं काही, संक्रांतीला प्रभासच्या 'द राजा साब'ची पहिली झलक समोर; लुंगी स्टाईलने वेधलं चाहत्यांचं लक्ष
Prabhas Film Poster Out : प्रभासचा 'द राजा साब' (The Raja Saab) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संक्रांतीच्या दिवशी या सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे.
Prabhas Raja Saab Poster Out : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या त्याच्या आगामी 'सालार' (Salaar) या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाकेदार कमाई करत आहे. 'सालार'नंतर प्रभासचा 'द राजा साब' (The Raja Saab) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संकांतीच्या दिवशी या सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे.
'द राजा साब'चं पोस्टर आऊट (The Raja Saab Poster Out)
प्रभासचा 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला होता. त्यानंतर 'सालार' या सिनेमाच्या माध्यमातून सुपरस्टारने प्रेक्षकांची मने जिंकली. 'सालार'च्या माध्यमातून धमाकेदार कमबॅक केल्यानंतर आता 'द राजा साब'च्या माध्यमातून बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी प्रभास सज्ज आहे. या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर नुकतचं आऊट झालं आहे.
'द राजा साब'चा फर्स्ट लूक आऊट! (The Raja Saab First Look Out)
दाक्षिणात्य सुपस्टार प्रभासने सोशल मीडियावर त्याच्या आगामी 'द राजा साब' या सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये काळा शर्ट, लुंगी आणि स्लीपर अशा लूकमध्ये प्रभास दिसत आहे. प्रभासने पोस्टर शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. पोस्टर शेअर करत प्रभासने लिहिलं आहे,"सणासुदीच्या दिवसांत 'द राजा साब'ची पहिली झलक समोर..तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा".
View this post on Instagram
प्रभासच्या 'द राजा साब' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मारुती प्रभासने सांभाळली आहे. या सिनेमात प्रभास अंतरंगी भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'द राजा साब'ची कथा थमन एस लिहिणार आहेत. तर टीजी विश्वा प्रसाद या सिनेमाची निर्मिती करत आहे.
प्रभासच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Prabhas Upcoming Movies)
प्रभसच्या 'सालार'ने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमा 400 तर जगभरात 610 कोटींची कमाई केली आहे. 270 कोटींच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रभासचे अनेक सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत.यात 'द राजा साब' सिनेमाचाही समावेश आहे. तसेच त्याचा 'कल्कि 2898' हा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यात तो दीपिका पादुकोणसोबत दिसणार आहे.
संबंधित बातम्या