(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kalki 2898 AD New Release Date : प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी'ची रिलीज डेट जाहीर! 'सालार'नंतर पुन्हा गाजवणार बॉक्स ऑफिस
Prabhas Kalki 2898 AD to Release on this Date : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'कल्कि 2898 एडी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या बहुचर्चित सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.
Prabhas Kalki 2898 AD to Release on this Date : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या 'सालार' (Salaar) या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस हा सिनेमा दणदणीत कमाई करत आहे. या सिनेमानंतर प्रभासचा 'कल्कि 2898 एडी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची रिलीज डेट आता समोर आली आहे.
सुपरस्टार प्रभासचा 'कल्कि 2898 एडी' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. आधी हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'कल्कि 2898 एडी' कधी रिलीज होणार? (Kalki 2898 Ad New Release Date)
'कल्कि 2898 एडी' या सिनेमाची नवी रिलीज डेट आता समोर आली आहे. नाग अश्विन दिग्दर्शित हा सिनेमा 9 मे 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'कल्कि 2898 एडी' या सिनेमात प्रभास आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि कलम हासनदेखील या सिनेमाचा भाग असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिनेप्रेमी आणि प्रभासचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. पण आता सिनेमाच्या रिलीजसाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रभासने या सिनेमाचं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"काऊंटडाऊन सुरू झालं आहे. 'कल्कि 2898 एडी' 9 मे 2024 रोजी जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होईल".
View this post on Instagram
तगडी स्टारकास्ट असलेला 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 Ad Starcast)
'कल्कि 2898 एडी' हा पौराणिक-विज्ञान कल्पित डायस्टोपियन सिनेमा आहे. या सिनेमात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पादुकोण आणि दिशा पटानी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 600 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
'कल्कि 2898 एडी' या सिनेमाचं नाव आधी 'प्रोजेक्ट के' (Project K) असं ठेवण्यात आलं होतं. पण नंतर या सिनेमाच नाव बदलण्यात आलं. या चित्रपटाला संतोष नारायणन यांनी संगीत दिले आहे, तर चित्रपटाची Cinematography जोर्डजे स्टोजिल्जकोविक यांनी केले आहे. तसेच चित्रपटाचे एडिटिंग कोटागिरी वेंकटेश्वर राव यांनी केले आहे.
संबंधित बातम्या