Potra Movie : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'पोटरा' सिनेमाची बाजी, ठरला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट
Potra : 'पोटरा' सिनेमाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'संत तुकाराम' हा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
Potra : 'पोटरा' (Potra) सिनेमाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Pune International Film Festival) 'संत तुकाराम' हा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शंकर धोत्रे यांनी केले आहे. तर नटराज एंटरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार तुर्कस्तानचा चित्रपट 'बिट्वीन टू डॉन्स'ला मिळाला आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध श्रेणींमध्ये निवडलेल्या चित्रपटांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत 'पोटरा' सिनेमा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने जागतिक वारीदेखील केली आहे. वर्ल्ड फिल्म कार्निव्हल-सिंगापूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये शंकर धोत्रे यांना पदार्पणातला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला होता. 'पोटरा' सिनेमा ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक स्थितीवर भाष्य करतो.
View this post on Instagram
पुणे आंतरराष्टीय चित्रपट महोत्सवाचे हे 20 वे वर्ष होते. महोत्सावात 65 देशांतील 110 चित्रपट दाखवण्यात आले. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते या महोत्सावाचे उद्धाटन करण्यात आले होते. यंदाचा महोत्सवर लता मंगेशकर यांना समर्पित करण्यात आला होता.
संबंधित बातम्या
Kaun Pravin Tambe Trailer Out : 'इक्बाल'नंतर श्रेयस पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, 'कौन प्रवीण तांबे'चा ट्रेलर रिलीज
Sharad Ponkshe : शरद पोंक्षे यांचं 'राष्ट्राय स्वाहा' हे नवं यू ट्यूब चॅनेल प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती...
Riteish Deshmukh On Jhund : रितेश देशमुखनं झुंडचं केलं कौतुक; म्हाणाला, 'नागराज मंजुळे हा देशातील...'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha