OTT Release This Week : वीकेंडला मनोरंजनाचा धमाका, 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज पाहायला विसरु नका
OTT Weekend Watch List : या वीकेंडला ओटीटीवर रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सीरिजची यादी पाहा.

OTT Must Watch This Week : वीकेंडला घरबसल्या ओटीटीवर मनोरंजनाचा आस्वाद घेण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या वीकेंडला तुम्ही घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार वेब सीरिज आणि चित्रपट पाहू शकता. या वीकेंडला तुमच्या मनोरंजनाचा प्लॅन रेडी आहे. वीकेंडला ओटीटीवर नवीन चित्रपट आणि वेब सीरिज स्ट्रीम होत आहेत, जे पाहत तुम्ही रिलॅक्स करु शकता. सध्या व्हॅलेंटाईन वीकही सुरु आहे. यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत कोझी होम डेट प्लॅन करत आराम देखील करु शकता. या वीकेंडला ओटीटीवर रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सीरिजची यादी पाहा.
मिसेज (Mrs)
अभिनेत्री सान्या मल्होत्राची मुख्य भूमिका असलेला मिसेज एका गृहिणीची कहाणी आहे. लग्नानंतर आपल्या भावना व्यक्त करणं किती कठीण होतं, ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाल आहे. तुम्ही 7 फेब्रुवारीपासून हा चित्रपट झी5 वर पाहू शकता.
गेम चेंजर (Game Changer)
साऊथ सुपरस्टार रामचरण आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा गेम चेंजर चित्रपट 7 फेब्रुवारीपासून ओटीटीवर स्ट्रीम होण्यास सुरुवात झाली आहे. गेम चेंजर हा चित्रपट पॉलिटिकल ॲक्शन ड्राम आहे. हा चित्रपट 10 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला. रिलीजला एक महिना पूर्ण होण्याआधीच हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
द मेहता बॉयज (The Mehya Boys)
बापलेकाच्या नात्याची कहाणी सांगणारा चित्रपट म्हणजे बोमन इराणी आणि अभिषेक तिवारी यांचा द मेहता बॉयज. ही कहाणी ह्रदयाला स्पर्श करणारी आहे.
बडा नाम करेंगे (Bada Naam Karenge)
सूरज बडजात्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. त्यांची फॅमिली ड्रामा वेब सीरीज बडा नाम करेंगे सोनी लिव्हवर प्रदर्शित झाली आहे. ही कथा एका अरेंज मॅरेजची कहाणी आहे. यामध्ये काय होतं आणि कसं होतं, हे खूप सुंदर पद्धतीने दाखवलं आहे.
द ग्रेटेस्ट राइवलरी (The Greatest Rivalry)
हा आठवडा क्रिकेट चाहत्यांसाठीही खूप छान जाणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर 'द ग्रेटेस्ट रिव्हलरी' ही क्रिकेट डॉक्यूमेंट्री प्रदर्शित झाली आहे. यामध्ये तुम्हाला भारत-पाकिस्तान सामन्याशी संबंधित अनेक कथा पाहायला मिळतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
VIDEO : उदित नारायण यांचा आणखी एक किसिंग व्हिडीओ व्हायरल; 'बुढापे में जवानी' अन् 'सीरियल किसर' म्हणत नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
