Happy Birthday Madhuri Dixit : 'तेजाब' ते 'देवदास'; माधुरी दीक्षितचे 'TOP 10' चित्रपट पाहिलेत का?
Madhuri Dixit Birthday : सलग सात चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरही माधुरी दीक्षित आज बॉलिवूडची स्टार आहे. अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता तिच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Madhuri Dixit : बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आज (15 मे 2024) आपला 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या 16 व्या वर्षी करिअरची सुरुवात करणाऱ्या माधुरीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने माधुरीने सर्वांनाच भूरळ पाडली आहे. उत्कृष्ट करिअरमध्ये तिने तेजाब (Tezaab), हम आपके है कौन (Hum Aapke Hain Koun), देवदाससह (Devdas) अनेक एका पेक्षा एक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. माधुरीचा यंदाचा वाढदिवस खूपच खास असणार आहे. अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. सलग सात चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरही आज ती बॉलिवूडची 'धक धक गर्ल' (Dhak Dhak Girl) आहे. माधुरीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या 'टॉप 10' (Madhuri Dixit TOP 10 Movies) चित्रपटांबद्दल जाणून घ्या...
तेजाब (Tezaab) : 'तेजाब' हा चित्रपट 1988 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील 'डिंग डांग डिंग' या गाण्यावरचा माधुरीचा डान्स चांगलाच गाजला. 'धक धक गर्ल'च्या करिअरच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये हा एक सिनेमा आहे. या चित्रपटातील 'एक दो तीन' हे गाणंदेखील चांगलच गाजलं. आजही हे गाणं माधुरी दीक्षिकचं आयकॉनिक सॉन्ग मानलं जातं. या चित्रपटासाठी माधुरीला चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
राम लखन (Ram Lakhan) : सुभाष घईंचा 'राम लखन' हा चित्रपट 1989 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने माधुरीला सुपरस्टार केलं. या चित्रपटात माधुरीने अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफसोबत स्क्रीन शेअर केली होती. बॉक्स ऑफिसवरदेखील या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला.
दिल (Dil) : इंद्र कुमार दिग्दर्शित 'दिल' या चित्रपटातील माधुरीच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. 1990 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. माधुरी दीक्षितसोबत या चित्रपटात आमिर खान झळकला. या चित्रपटासाठी माधुरी दीक्षिकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
प्रहार: द फायनल अटॅक (Prahaar: The Final Attack) : नाना पाटेकर दिग्दर्शित 'प्रहार: द फायनल अटॅक' या चित्रपटात माधुरी मुख्य भूमिकेत होती. माधुरी दीक्षितसह या चित्रपटात नाना पाटेकर, मकरंद देशपांडे, नाना पाटेकर, डिंपल कपाडिया आणि गौतम जोगळेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
साजन (Saajan) : 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'साजन' या चित्रपटाचं दिग्दर्शन लॉरेंस डिसूजाने केलं आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत सलमान खान आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते. माधुरीचा हा चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटातील 'देखा है पहली बार','तुम से मिलने की तमन्ना है','तू शायर है में तेरी शायरी' या गाण्यांनी प्रेक्षकांवर राज्य केलं आहे.
खलनायक (Khal Nayak) : सुभाष घई यांचा 'खलनायक' हा चित्रपट 1993 मध्ये प्रदर्शित झाला. त्या वर्षातला हा सुपरहिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटात माधुरीने गंगा ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील 'नायक नहीं खलनायक है तू' या गाण्याने सर्व रेकॉर्ड्स तोडले. तसेच याच चित्रपटातील 'चोली के पीछे क्या है' या गाण्याने लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य केलं.
हम आपके है कौन (Hum Aapke Hain Koun) : सूरज बडजात्या दिग्दर्शित 'हम आपके है कौन' हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील माधुरी आणि सलमान खानची जोडी चांगलीच गाजली. निशा नामक चुलबुली मुलीची भूमिका माधुरीने साकारली होती.
दिल तो पागल है (Dil To Pagal Hai) : माधुरी दीक्षितच्या 'दिल तो पागल है' या चित्रपटाला आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. यश चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट 1997 मध्ये रिलीज झाला होता. माधुरी दीक्षितसह या चित्रपटात शाहरुख खान आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत होते. माधुरी-शाहरुखचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
परिंदा (Parinda) : विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित 'परिंदा' हा माधुरीच्या यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. 1989 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. माधुरी दीक्षितसह या चित्रपटात नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. माधुरीने या चित्रपटात पारो ही भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी माधुरीला दोन राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले.
देवदास (Devdas) : 'देवदास' हा चित्रपट 2002 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. माधुरी चित्रपटात चंद्रमुखीच्या भूमिकेत होती. माधुरी दीक्षितसह या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत होते.
संबंधित बातम्या