महाकुंभातील 'त्या' अप्सरेचं कंगना रणौतकडून कौतुक, बॉलिवूडच्या गोऱ्या अभिनेत्रींवर निशाणा साधत म्हणाली...
Kangana Ranaut On Maha Kumbh Monalisa : कंगना रणौतने महाकुंभातील मोनालिसाच्या सौंदर्यावर दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Kangana Ranaut Reaction On Viral Girl Monalisa : अभिनेत्री कंगना रणौत तिच्या परखड मतांसाठी ओळखली जाते. प्रत्येक ट्रेंडिंग आणि चर्चेतील विषयांवर ती तिची भूमिका स्पष्टपणे मांडते. असे कुठलेही मुद्दे तिच्या नजरेखालून सुटत नाही. अभिनेत्री कंगना रणौतची नजर आता सोशल मीडिया सेन्सेशन मोनालिसावर पडली आहे. महाकुंभातील व्हायरल गर्ल मोनालिसाच्या सौंदर्याने बॉलिवूडचू क्वीन कंगना रणौतही मोहित झाली आहे. कंगनाने 'डस्की ब्युटी' मोनालिसाचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.
महाकुंभातील 'डस्की ब्युटी'चं कंगना रणौतकडून कौतुक
मोनालिसाच्या सौंदर्याने कंगनालाही आश्चर्यचकित केलं आहे. मोनालिसाच्या सौंदर्याने कंगना कमालीची प्रभावित झाली आहे आणि तिने आता तिच्या इंस्टाग्राम हँडलवर मोनालिसावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एवढंच नाही तर कंगनाने पुन्हा एकदा मोनालिसाच्या नावाने बॉलिवूड आणि अभिनेत्रींवर निशाणा साधला आहे. कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूड इंडस्ट्रीवर बोचरी टीका केली आहे. आता कंगना रणौतची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये कृष्णवर्ण अभिनेत्री का नाहीत?
अभिनेत्री कंगना रणौतने पोस्टमध्ये म्हटलंय, शोबिझमध्ये आता फारसे सावळ्या किंवा कृष्णवर्ण भारतीय महिला कलाकार शिल्लक नाहीत. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर महाकुंभातील व्हायरल गर्ल मोनालिसाबद्दल तिचे विचार व्यक्त केले आहेत. कंगनाने पोस्टमध्ये लिहीलंय की , फोटोंसाठी मुलीला ज्या पद्धतीने त्रास दिला जात आहे. त्यामुळे ती निराश आहे आणि आजच्या काळात इंडस्ट्रीतील कोणत्याही तरुण अभिनेत्री सावळी किंवा कृष्णवर्ण का नाही, हा विचार करण्याची वेळ आली आहे.
बॉलिवूड अभिनेत्रींवर निशाणा साधत म्हणाली...
कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर मोनालिसाचा एक फोटो शेअर केला आणि लिहिलं की, 'ही तरुणी मोनालिसा तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. तिच्या फोटो आणि मुलाखतींसाठी लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली आहे आणि मला ते आवडलेलं नाही. ग्लॅमर जगात आता आपल्याकडे सावळ्या रंगाच्या भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व पुरेसे आहे का, असा प्रश्न मला पडलाय. लोक तरुण अभिनेत्रींवर अनु अग्रवाल, काजोल, बिपाशा, दीपिका किंवा राणी मुखर्जी यांच्यासारखे प्रेम करत आहेत का? असा प्रश्नही कंगनाने यावेळी उपस्थित केला आहे.
पुढे तिने लिहिलंय आहे की, 'आता सर्व अभिनेत्री गोऱ्या का दिसत आहेत. यामध्ये ती अभिनेत्रीही सामील आहे, जी तरुण वयात सावळी होती? लोक नवीन अभिनेत्रींना मोनालिसाच्या रुपात का पाहू शकत नाहीत? खूप जास्त लेझर आणि ग्लूटाथियोन इंजेक्शनचा वापर होत आहे'. असं म्हणत कंगनाने पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्री आणि अभिनेत्रींची पोलखोल केली आहे.
कंगना रणौतने पोस्टमध्ये काय म्हटलंय?
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Raj Thackeray : छावा सिनेमा प्रत्येकाने बघायलाच हवा, राज ठाकरेंचं आवाहन, कारणही सांगितलं!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
