Honey Singh Divorce : हनी सिंहचा लग्नाच्या 12 वर्षांनंतर घटस्फोट; पत्नीने केलेले घरगुती हिंसाचाराचे आरोप
Honey Singh : लोकप्रिय रॅपर हनी सिंहचा लग्नाच्या 12 वर्षांनंतर घटस्फोट झाला आहे. पत्नी शालिनी तलवारने (Shalini Talwar) त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केला होता.
![Honey Singh Divorce : हनी सिंहचा लग्नाच्या 12 वर्षांनंतर घटस्फोट; पत्नीने केलेले घरगुती हिंसाचाराचे आरोप Honey Singh Divorce With Wife Shalini Talwar After 12 Years Of Marriage Know Latest Update Bollywood News gossips Singer Yo Yo Honey Singh Indian rapper Delhi court Honey Singh Divorce : हनी सिंहचा लग्नाच्या 12 वर्षांनंतर घटस्फोट; पत्नीने केलेले घरगुती हिंसाचाराचे आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/08/1f32533bdbeb358fe389662a9aaf2fd81699408394873254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Honey Singh Divorce With Shalini Talwar : लोकप्रिय रॅपर आणि गायक हनी सिंह (Honey Singh) आणि वाद हे जुनं समीकरण आहे. अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळेही हनी सिंह चर्चेत असतो. पण आता हनी सिंह त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हनीचा लग्नाच्या 12 वर्षांनंतर घटस्फोट झाला आहे. पत्नी शालिनी तलवारने (Shalini Talwar) त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते.
12 वर्षांच्या संसारानंतर हनी सिंह अन् शालिनी विभक्त (Honey Singh Divorce With Shalini Talwar)
हनी सिंह (Honey Singh) आणि शालिनी (Shalini Talwar) यांच्या घटस्फोटाला दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने (Delhi Court) मंजुरी दिली आहे. हनी आणि शालिनी यांच्यात गेल्या अडीच वर्षांपासून घटस्फोटाचा खटला सुरू होता. अखेर लग्नाच्या 12 वर्षांनंतर ते विभक्त झाले आहेत.
हनी सिंह आणि शालिनी तलवार 2011 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. 2021 मध्ये हनी सिंह आणि शालिनी यांनी घटस्फोटासाठी दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. शालिनीने हनी सिंहवर कौटुंबिक हिंसाचार तसेच मानसिक छळाचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू होता. न्यायालयाने हनी सिंहला घटस्फोटाआधी त्यांच्या नात्यास आणखी एक संधी देण्यास सांगितलं होतं. त्यावेळी रॅपर म्हणाला होता,"आता शालिनीसोबत राहण्यात काही अर्थ नाही".
हनी सिंहचा संसार तुटला...
यो यो हनी सिंह (Yo Yo Honey Singh) आणि शालिनी तलवार (Shalini Talwar) यांची लव्हस्टोरी खूप खास आहे. लग्नाआधी अनेक वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. अखेर 2011 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. संसार थाटल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यात सर्वकाही अलबेल होतं.
शालिनीने 2021 मध्ये हनी सिंहवर घरगुती हिंसाचार, मारहाण, मानसिक तणावासह अनेक आरोप केले होते. 2022 मध्ये घटस्फोटासाठी हनी सिंहला न्यायालयात हजर राहायचं होतं. पण काही कारणाने त्याला न्यायालयात हजर राहता आले नाही. त्यावेळी न्यायालयाने हनी सिंहला खडसावलं. आता घटस्फोटाची याचिका दाखल केल्यानंतर दोन वर्षांनी हनी सिंह आणि शालिनी एकमेकांपासून विभक्त (Honey Singh Divorce) झाले आहेत. हनी सिंहचा संसार तुटल्याने चाहते नाराज झाले आहेत.
संबंधित बातम्या
Honey Singh : यो यो हनी सिंहच्या आयुष्यावर येणार डॉक्युमेंट्री! पोस्ट शेअर करत रॅपरने दिली माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)