![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gautami Patil Father : गौतमी पाटीलचे वडील सापडले बेवारस अवस्थेत; धुळ्यातील रुग्णालयात उपचार सुरू
Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील बेवारस अवस्थेत सापडले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
![Gautami Patil Father : गौतमी पाटीलचे वडील सापडले बेवारस अवस्थेत; धुळ्यातील रुग्णालयात उपचार सुरू Gautami Patil Father was found destitute Hospital treatment started dhule news dancer entertainment Gautami Patil Father : गौतमी पाटीलचे वडील सापडले बेवारस अवस्थेत; धुळ्यातील रुग्णालयात उपचार सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/02/73b2f902f690d0c1ebb4b148261199b01693649950965254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gautami Patil Father : लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या गौतमीचे वडील बेवारस अवस्थेत सापडले आहे. रवींद्र बाबुराव नेरपगारे पाटील असे गौतमीच्या वडिलांचे नाव असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धुळे शहरातील आजळकर नगर भागात एक व्यक्ती मरणासन्नावस्थेत असल्याची माहिती स्वराज्य फाउंडेशनच्या दुर्गेश चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळी जाऊन बेवारस अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्यांनी समाज माध्यमांवर त्या व्यक्तीचा फोटो आणि त्यांच्याकडे मिळून आलेले आधार कार्ड टाकल्यानंतर सदर व्यक्ती सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचे (Gautami Patil Father) वडील रवींद्र बाबुराव पाटील असल्याचं समोर आलं आहे.
धक्कादायक माहिती समोर येताच स्वराज्य फाउंडेशनच्या दुर्गेश चव्हाण यांनी गौतमीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर नाशिक येथे असणारे त्यांचे काही नातेवाईक तात्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. गौतमी पाटीलच्या वडिलांवर सध्या धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती स्वराज्य फाउंडेशनचे दुर्गेश चव्हाण यांनी दिली आहे.
गौतमी पाटीलच्या वडिलांवर धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू
गौतमी पाटीलच्या वडिलांवर धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच गौतमी पाटीलची काकू आणि तिची चुलत बहीण हे हिरे रुग्णालयात दाखल झाले मात्र त्यांनी गौतमी पाटीलशी आमचा काहीही संबंध नाही अशी माहिती दिली आहे.
गौतमी पाटीलचे वडील काही दिवसांपूर्वी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते,"मला अनेकवेळा गौतमीची आठवण येते. पण तिच्याबरोबर कधी संपर्क झाला नाही.' गौतमी पाटील करत असलेल्या नृत्याबाबत आनंद वाटतो. मात्र काही जण तिच्यावर ज्या टीका करतात, त्याच वाईट देखील वाटतं". गौतमीचे वडील हे शेतकरी आहेत.
आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली. पण तरीही तिने आपल्या अदाकरीने महाराष्ट्राला वेड लावलं आहे. बदनामीकडे दुर्लक्ष करत तिने नृत्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. तिचा 'घुंगरू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात तुफान राडा, नोटांची उधळण होत असते. गौतमी आपल्या नृत्याला अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप तिच्यावर अनेकांनी केला होता. पण तरीही तिच्या नृत्याची क्रेझ मात्र कायम आहे.
संबंधित बातम्या
Gautami Patil Father : आडनावावरुन सुरु असणाऱ्या वादावर गौतमी पाटीलच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)