Gautami Patil Father : आडनावावरुन सुरु असणाऱ्या वादावर गौतमी पाटीलच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Gautami Patil Father: गौतमीमुळे पाटील या आडनावाची बदनामी होते, त्यामुळे तिने पाटील आडनाव वापरू नये अशी मागणी एका संघटनेकडून करण्यात आली होती यावर आता गौतमीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले गौतमी पाटीलचे वडील?
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौतमी पाटीलचे (Gautami Patil) वडील रवींद्र नेरपगारे पाटील यांनी गौतमीच्या नावाबाबत सांगितले. गौतमीचे वडील रवींद्र पाटील यांनी गौतमीच्या नावाबाबत म्हणाले, 'गौतमीचं शाळेतील दाखल्यावरील नाव गौतमी पाटील आहे आणि जन्म नाव वैष्णवी आहे. मी 20 वर्षांपासून गौतमी आणि तिच्या आईपासून वेगळं राहात आहे. '
काही लोकांचे मत आहे की गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये, याबाबत गौतमीच्या वडिलांना प्रश्न विचारण्यात आला. यावर रवींद्र यांनी उत्तर दिल, 'जर तिचं आडनाव पाटील आहे तर ती पाटील आडनाव हे लावणारच.'
गौतमीच्या वडिलांनी पुढे सांगितलं, 'मला अनेकवेळा गौतमीची आठवण येते. पण तिच्याबरोबर कधी संपर्क झाला नाही.' गौतमी पाटील करत असलेल्या नृत्याबाबत आनंद वाटतो. मात्र काही जण तिच्यावर ज्या टीका करतात, त्याच वाईट देखील वाटतं, असंही गौतमी पाटीलचे वडील रवींद्र नेरपगारे पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं. गौतमीचे वडील हे गेल्या वीस वर्ष पासून ते शेती करत आहेत.
काही दिवसांपूर्वी आडनावावरुन सुरु असलेल्या वादाबाबत गौतमीला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी गौतमी म्हणाली, 'मी पाटीलच आहे आणि हे नाव मी वापरणारच माझ्याबद्दल कोणी काहीही बोलले तरी, मला काही फरत पडत नाही. मी जे कार्यक्रम करते ते, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.' माझे हे कार्यक्रम चांगले पार पडत आले आहे. गौतमी पाटील ही मूळची धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आहे. काही दिवसांपुर्वी गौतमीचा 'खान्देश कन्या' म्हणून गौरवही करण्यात आला होता. गौतमी पाटील ही अनेक वेळा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
संबंधित बातम्या