Jawan : 'जवान' संसदेत दाखवण्याची मोदी सरकारची हिंमत आहे का? कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांचा सवाल; शाहरुखच्या सिनेमाला राजकीय वळण
Jawan Movie : काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी 'जवान' सिनेमासंदर्भात ट्वीट करत मोदी सरकारला एक प्रश्न विचारला आहे.
Congress Former Minister Jairam Ramesh Tweet On Shah Rukh Khan Jawan Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. फक्त तीन दिवसांत या सिनेमाने 200 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. पण आता या सिनेमाला राजकीय वळण आलं आहे.
सनी देओल (Sunny Deol) अभिनीत 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचं संसदेत विशेष स्क्रीनिंग (Gadar 2 Screened In New Parliament Building) आयोजित करण्यात आलं होतं. दरम्यान काँग्रेसचे माजी मंत्री जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी मोदी सरकार शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा संसदेत दाखवण्याची हिंमत करेल का? असा प्रश्न विचारला आहे.
जयराम रमेश काय म्हणाले?
जयराम रमेश यांनी ट्वीट केलं आहे,"नव्या संसद भवनात काही दिवसांपूर्वी सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा दाखवण्यात आला होता. आता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा दाखवण्याची मोदी सरकार हिंमत करेल का?". त्यांच्या या ट्वीटवर यूजर्सने कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Gadar-2 was shown in the new Parliament building a few days back. Will the Modi Sarkar have the courage to screen Jawan as well?
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 9, 2023
नए संसद भवन में कुछ दिन पहले गदर-2 दिखाया गया था। क्या मोदी सरकार में जवान की भी स्क्रीनिंग कराने की हिम्मत है?
शाहरुख खानच्या 'जवान' या सिनेमात शेतकरी, त्यांच्या आत्महत्या अशा अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे. महागडी कार आणि शेतकऱ्याता ट्रॅक्टर यांच्या व्याजदरात फरक का? देशातील सार्वजनिक रुग्णालयांची अवस्था कशी आहे? सरकार निवडून देताना तुम्ही विचार का करत नाही, असे प्रश्न या सिनेमात किंग खान विचारत आहे.
'जवान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Jawan Box Office Collection Day 3)
'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी दहीहंडीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारतात रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 75 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 74.5 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 202.73 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या सिनेमाने 239 कोटींची कमाई केली आहे. आज म्हणजेच रिलीच्या चौथ्या दिवशी हा सिनेमा 300 कोटींच्या क्ल्बमध्ये सामील होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या