Jawan Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर शाहरुखचा जलवा! 'जवान' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील
Jawan Box Office Collection Day 3 : बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा किंग खानचा जलवा पाहायला मिळत आहे.
Shah Rukh Khan Jawan Box office Collection Day 3 : अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा सिनेमागृहात धमाका करत आहे. रिलीजआधापासून चर्चेत असलेल्या या सिनेमाची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. ओपनिंग डेला चांगला गल्ला जमवलेल्या या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत दणदणीत कमाई केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'जवान'चा जलवा पाहायला मिळत आहे.
'जवान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Jawan Box Office Collection Day 3)
'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी दहीहंडीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारतात रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 75 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 74.5 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 202.73 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या सिनेमाने 239 कोटींची कमाई केली आहे. आज म्हणजेच रिलीच्या चौथ्या दिवशी हा सिनेमा 300 कोटींच्या क्ल्बमध्ये सामील होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
View this post on Instagram
शाहरुख खानची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. चाहते 'जवान' आवडीने पाहत आहेत. सिनेमागृहात धुमाकूळ घालणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमाचा किताब पटकावला.
'जवान'ने केला 'पठाण'चा रेकॉर्ड ब्रेक
'जवान' आधी शाहरुखचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'पठाण' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत 160 कोटींची कमाई केली. पण 'जवान'ने तीन दिवसांत 202.73 कमाई करत 'पठाण'चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'पठाण' या सिनेमाने भारतात 50 दिवसांत 540.51 कोटींची कमाई केली होती. तर जगभरात या सिनेमा 1047 कोटींचा गल्ला जमवला होता. आता 'जवान' हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'जवान' आधी शाहरुख खानचा बहुचर्चित 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. रिलीजच्या 30 दिवसांनंतरही हा सिनेमा प्रेक्षक आवडीने पाहत आहेत. पण 'गदर 2' या सिनेमाच्या कमाईत आला घसरण होऊ शकते. 'गदर 2' पेक्षा सिनेप्रेमी आता 'जवान' पाहायला पसंती दर्शवत आहेत.
संबंधित बातम्या