![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Cillian Murphy : 'Oppenheimer'साठी हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फीने केले 'Bhagavad Gita'चे पठण; म्हणाला...
Cillian Murphy : हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फीने भगवद्गीतेचे (Bhagavad Gita) पठण केले आहे.
![Cillian Murphy : 'Oppenheimer'साठी हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फीने केले 'Bhagavad Gita'चे पठण; म्हणाला... Cillian Murphy says he read the Bhagavad Gita to prepare for Oppenheimer J Robert Oppenheimer know hollywood movie released date Cillian Murphy : 'Oppenheimer'साठी हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फीने केले 'Bhagavad Gita'चे पठण; म्हणाला...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/991257d35a889dda29162479b9ecbc521689583237934254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Cillian Murphy : 'ओपेनहाइमर' (Oppenheimer) या हॉलिवूड सिनेमाची (Hollywood Movie) काही दिवसांपूर्वी घोषणा झाली आहे. 2023 च्या बहुचर्चित हॉलिवूड सिनेमांत 'ओपेनहाइमर' या सिनेमाचा समावेश आहे. क्रिस्टोफर नोलन (Christopher Nolan) दिग्दर्शित या सिनेमाची सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे. या सिनेमात हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फी (Cillian Murphy) मुख्य भूमिकेत आहे. आता या सिनेमासाठी सिलियनने भगवद्गीतेचे पठण केल्याचं समोर आलं आहे.
सिलियन मर्फी सध्या त्याच्या आगामी 'ओपेनहाइमर' (Oppenheimer) या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. आता सुचारिता त्यागीला दिलेल्या मुलाखतीत सिलियनने 'ओपेनहाइमर' सिनेमासाठी भगवद्गीतेचे पठण केल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला आता आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटत आहे.
सिलियन मर्फी 'ओपेनहाइमर' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 'ओपेनहाइमर' हा सिनेमा अमेरिकेचे भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट ओपेनहाइमर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे रॉबर्ट ओपेनहाइमर यांचं काम रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अणुबॉम्बचा शोध लावण्याचे श्रेय रॉबर्ट यांना जातं. 'ओपेनहाइमर' या सिनेमात रॉबर्ट ओपेनहाइमर यांच्या भूमिकेत सिलियन मर्फी झळकणार आहे.
View this post on Instagram
'ओपेनहायमर' या सिनेमाबद्दल बोलताना सिलियन मर्फीने सांगितलं की,"ओपेनहायमर' सिनेमा माझ्यासाठी खूपच खास आहे. या सिनेमात मी रॉबर्ट ओपेनहाइमर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या प्रोसेसदरम्यान मी भगवद्गीतेचे पठण केले आहे. भगवद्गीतेचे पठण केल्याने मला प्रेरणा मिळाली आहे.
'ओपेनहायमर' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (Oppenheimer Released Date)
'ओपेनहायमर' हा हॉलिवूडच्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाची जगभरातील सिनेप्रेमींना उत्सुकता आहे. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित हा सिनेमा 21 जुलै 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
रॉबर्ट ओपेनहायमर कोण आहेत? (Who Is J. Robert Oppenheimer)
दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक रॉबर्ट ओपेनहायमर. ज्यू वंशाचे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. आण्विक शस्त्रास्त्रे विकसित करण्याचे उद्दिष्ट असलेल्या मॅनहटन प्रकल्पाचे ते प्रमुख होते. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्यावर भगवद्गीतेचा मोठा प्रभाव होता. 16 जुलै 1945 मध्ये अणुबॉम्बची चाचणी यशस्वी झाल्यानंतर रॉबर्ट ओपेनहायमर यांना भगवद्गीते मधील एका श्लोकाचा अर्थ डोक्यात आला. 'now i am become death the destroyer of worlds' आणि त्यांचा तो व्हिडीओ आजही खूप व्हायरल आहे. त्यांना भगवद्गीतेचे भाषांतर वाचायचे नव्हतं म्हणून त्यांनी खास संस्कृत शिकले असं म्हणतात आणि त्यानंतर रॉबर्ट यांनी या काळात बरेच भगवद्गीतेचे दाखले दिल्याचं समजतं.
संबंधित बातमी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)