एक्स्प्लोर

Rocketry: The Nambi Effect : भारतासाठी अभिमानाचा क्षण! आर. माधवनच्या 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट'ला कान्समध्ये 'स्टँडिंग ओव्हेशन'!

Cannes Film Festival 2022 : अभिनेता आणि दिग्दर्शक बनलेल्या आर. माधवनचा ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट रॉकेट सायंटिस्ट नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचा काल (20 मे) रात्री कान्स येथे प्रीमियर झाला.

Cannes Film Festival 2022 : अभिनेता आर. माधवनच्या (R Madhavan) दिग्दर्शनातील पदार्पण ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’चा (Rocketry: The Nambi Effect) भव्य प्रीमियर पॅलेस डेस फेस्टिव्हल्सच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाला. या सोहळ्यात आर. माधवन आणि इस्रोचे प्रतिभाशाली अंतराळ शास्त्रज्ञ नंबी नारायणन (Nambi Narayan) यांनी रेड कार्पेटवर शानदार एन्ट्री केली. हा चित्रपट शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्यावर आधारित आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला टाळ्यांचा कडकडाट झाला, इतकेच नाही, तर या चित्रपटाला तब्बल 10 मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले.

चित्रपट महोत्सवात त्याच्या चित्रपटाला मिळालेल्या कौतुकाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, अभिनेता-दिग्दर्शक माधवन याने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘मी भारावून गेलो आहे आणि उत्साहित आहे. टीम रॉकेट्रीमध्ये असलेल्या सर्वांसाठीच हा अभिमानाचा क्षण आहे. यासाठी मी सर्वांचा कृतज्ञ आहे. तुमच्या सर्व प्रेम आणि पाठींबा याबद्दल धन्यवाद. हा चित्रपट 1 जुलै रोजी रिलीज होणार आहे.’

पाहा पोस्ट :

‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाच्या माध्यमातून आर. माधवन बॉलिवूड दिग्दर्शकीय पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण भारत, फ्रान्स, कॅनडा, जॉर्जिया आणि सर्बियामध्ये झाले आहे. फिलिस लोगान, व्हिन्सेंट रीटा आणि रॉन डोन्ची यांच्या मदतीने आणि सुपरस्टार शाहरुख खान आणि सूर्या यांच्या कॅमिओसह, हा चित्रपट 1 जुलै 2022 रोजी हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडसह जगभरात प्रदर्शित होईल.

माधवनचे कौतुक!

या चित्रपटाचा प्रीमियर पाहिल्यानंतर प्रत्येकजण माधवनचे कौतुक करताना दिसत आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या अश्विनी चौधरी यांनी प्रीमियरचा एक व्हिडीओ शेअर करून माधवनचे कौतुक केले. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक एआर रहमान यांनीही सोशल मीडियावर माधवन आणि त्याच्या चित्रपटाचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. ट्विटरवर पोस्ट शेअर करताना रहमान यांनी लिहिले की, ‘कान्समध्ये रॉकेट्री : द नंबी इफेक्ट हा चित्रपट आत्ताच पाहिला. भारतीय चित्रपटसृष्टीला नवा आवाज दिल्याबद्दल माधवनचे आभार.’ प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही माधवन आणि त्याच्या चित्रपटाचे कौतुक केले.

नंबी नारायणन यांची उपस्थिती ठरली खास!

अभिनेता आणि दिग्दर्शक बनलेल्या आर. माधवनचा ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट रॉकेट सायंटिस्ट नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचा काल (20 मे) रात्री कान्स येथे प्रीमियर झाला. खुद्द नंबी नारायणन यांनी देखील या प्रीमियरला हजेरी लावली होती. त्यांची प्रेक्षकांमध्ये उपस्थिती या सोहळ्यात खास ठरली.

या चित्रपटाचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन आर. माधवन यांनी केले आहे. नुकताच, ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला, ज्यामध्ये नंबी नारायण यांना नासाकडून ऑफर मिळाल्याचे दाखवण्यात आले आहे. नंबी यांच्या जीवनावर आधारित, हा चित्रपट फ्रान्समधील कान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 19 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Jr NTR : ज्युनियर एनटीआरच्या बिग बजेट चित्रपटाची घोषणा! धमाकेदार मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

Cannes Film Festival 2022 : ती गुलाबी परी जणू... ‘कान्स चित्रपट महोत्सवात’ ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा जलवा!

महत्त्वाच्या बातम्या

Actor Jeevan Struggle Life Story: 60 सिनेमांचा 'नारद मुनी', फक्त 26 रुपये घेऊन गाठलेली 'स्वप्नांची नगरी'; नशीब फळफळलं अन् बनला इंडस्ट्रीचा सुपरस्टार 'खलनायक'
60 सिनेमांचा 'नारद मुनी', फक्त 26 रुपये घेऊन गाठलेली 'स्वप्नांची नगरी'; नशीब फळफळलं अन् बनला इंडस्ट्रीचा सुपरस्टार 'खलनायक'
Salman Khan: सलमान खानच्या डोळ्यात पाणी, जवळच्या व्यक्तीचे कॅन्सरने निधन; शेवटचा निरोप देताना कुटुंबही भावुक
सलमान खानच्या डोळ्यात पाणी, जवळच्या व्यक्तीचे कॅन्सरने निधन; शेवटचा निरोप देताना कुटुंबही भावुक
Fifa World Cup: नोरा फतेहीचा इंटरनॅशनल जलवा; Siir Siir गाण्यानं धुमाकूळ घातला, 18 तासांत 6.1 मिलियन व्ह्यूज
नोरा फतेहीचा इंटरनॅशनल जलवा; Siir Siir गाण्यानं धुमाकूळ घातला, 18 तासांत 6.1 मिलियन व्ह्यूज
Manjari Fadnis: डोक्यात सळीनं मारलं, गोणीत भरलं अन् खाडीत...; प्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
डोक्यात सळीनं मारलं, गोणीत भरलं अन् खाडीत...; प्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
America missile attack on Iran:America missile attack on hormuz region destroyed Iran Air defence Drone and Radar system after iran army irgc shot down american army apache helicopter
इराणने अपाचे हेलिकॉप्टर पाडलं, अमेरिकेचा होमुर्झवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा, युद्ध पुन्हा भडकणार?
Vasai Crime News: इमारतीपर्यंत पाठलाग केला, मग हळूच महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घातला; वसईमधील धक्कादायक प्रकार, रात्री 10.45 वाजता काय घडलं?
इमारतीपर्यंत पाठलाग केला, मग हळूच महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घातला; वसईमधील धक्कादायक प्रकार
Maharashtra Live blog updates: गोरेगावच्या नेस्को ड्रग्स प्रकरणी राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयात मोठा दावा
Maharashtra Live blog updates: गोरेगावच्या नेस्को ड्रग्स प्रकरणी राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयात मोठा दावा
Financial Freedom : आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
Gold vs US Dollar : आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
Share Market : बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
Embed widget