एक्स्प्लोर

Bollywood Actress Education : शाळेत न गेलेली कतरिना ते सर्वात कमी शिकलेली करिष्मा; बॉलिवूडमधील नायिकांचे शिक्षण किती? जाणून घ्या...

Bollywood Actress Education : बॉलिवुडमध्ये काम करून कोट्यावधींची कमाई करणाऱ्या या नायिकांचे शिक्षण किती झाले आहे हे तुम्हाला कळले तर चकितच व्हाल.

Bollywood Actress Education : एका वेबसीरीजच्या प्रमोशनवेळी अभिनेत्री काजोलने (Kajol) देशातील राजकीय नेत्यांच्या शिक्षणावर वक्तव्य केलं आणि एकच गदारोळ माजला. काजोलनं म्हटलं, आपल्या देशात बदल हा धीम्या गतीने होतोय. कारण आपण आपल्या परंपरा आणि विचारांमध्ये मग्न आहोत आणि अर्थातच त्याचा संबंध शिक्षणाशीही आहे. तुमच्याकडे असे राजकीय नेते आहेत ज्यांची कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. मला याचा खेद आहे. देशावर राजकारण्यांची सत्ता आहे. यापैकी अनेक नेत्यांजवळ तर दृष्टिकोनच नाही, मला वाटतं हा दृष्टिकोन तुमच्यात शिक्षणामुळे येतो. शिक्षणच तुम्हाला विविध कोनांतून पाहण्याची संधी देते.

काजोल या वक्तव्यानंतर प्रचंड ट्रोल झाली. अनेकांनी काजोलकडे तिच्या शिक्षणाची विचारणा केली. केवळ काजोलच (Kajol) नव्हे तर बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक अभिनेत्रींचं शिक्षण हे केवळ पाचवी ते बारावीपर्यंतच झालेले आहे. अनेक उच्चशिक्षित मुली जितका पैसा कमवत नाहीत, त्यापेक्षा कितीतरी पटीने बॉलिवूडमधील या कमी शिकलेल्या मुली कमवतायत. काजोलच्या म्हणण्याप्रमाणे देशातील नेत्यांकडे शिक्षणामुळे दृष्टीकोण नाही, मात्र बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये दृष्टीकोण आहे असे तिला म्हणायचे आहे असे वाटते. बॉलिवुडमध्ये काम करून कोट्यावधींची कमाई करणाऱ्या या नायिकांचे शिक्षण किती झाले आहे हे तुम्हाला कळले तर चकितच व्हाल.

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करायचे असले तर शिक्षण कमी असले तरी चालेल, चेहरा सुंदर हवा, फाडफाड इंग्लिश बोलता यायला पाहिजे आणि आत्मविश्वास हवा. या तीन गोष्टींच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता आणि हेच या कमी शिकलेल्या नायिकांनी दाखवून दिले आहे.

बॉलिवूडमधील नायिकांचे शिक्षण किती? जाणून घ्या...

काजोल (Kajol) : काजोलचं (Kajol) स्वतःचं शिक्षण फार झालेलं नाही. काजोलने पाचगणी येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतले आहे. मात्र वयाच्या सोळाव्या वर्षीच तनुजाने काजोलसाठी बेखुदी सिनेमाची योजना आखली आणि काजोलने शूटिंगमधून वेळ मिळत नसल्याने शिक्षण अर्धवट सोडले आणि ती पूर्ण वेळ अभिनेत्री झाली. ट्रोल झाल्यानंतर आता मात्र काजोलने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. मला तसे म्हणायचे नव्हते तर शिक्षणाचे महत्व समजावून सांगायचे होते असे म्हटले आहे.

कतरिना कैफ (Katrina Kaif) : सध्याची आघाडीची नायिका आणि विक्की कौशलची (Vicky Kaushal) पत्नी कतरिना कैफ (Katrina Kaif) किती शिकली आहे? वाचून तुम्हाला धक्का बसेल. मानसिक तयारी ठेऊन ऐका. कतरिना आयुष्यात कधीही शाळेत गेली नाही. धक्का बसला ना. पण हे खरे आहे. कतरिनाला आपल्या आई-वडिलांसोबत सतत वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत असल्याने ती शाळेतच गेली नाही. तिला घरीच शिकवणी लावण्यात आलेली होती. मात्र लहानपणापासूनच ती धाडसी असल्याने आणि नायिका होण्याचे स्वप्न असल्याने तिने त्याकडे लक्ष दिले. मॉडेलिंग करता-करता ती बॉलिवुडमध्ये आली आणि दुय्यम दर्जाची कामे करू लागली. नंतर मात्र तिने स्वतःला बदलले आणि ती आघाडीची नायिका झाली.

करिष्मा कपूर (Karisma Kapoor) : बॉलिवुडच्या नायिकांमध्ये सगळ्यात कमी शिकलेली नायिका कोण असेल तर ती आहे करिश्मा कपूर (Karishma Kapoor). करिश्माचे शिक्षण पाहाल तर तुम्ही म्हणाल असे कसे. पण हे आहे खरे. करिश्मा फक्त पाचवी पास आहे. करिश्मा पाचवी पास झाली आणि सहावीत गेली. परंतु तेव्हापासूनच तिने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तिने पुन्हा शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. बॉलिवुडमध्ये तिने पदार्पण केल्यानंतर 90 च्या दशकात ती आघाडीची नायिका झाली होती.

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) : दीपिका पदुकोणही (Deepika Padukone) फक्त बारावी पास आहे. दीपिकाने बेंगळुरूच्या सोफिया हायस्कूलमधून बारावी पूर्ण केले आहे. बारावीनंतर दीपिकाने बेंगळुरुच्याच माऊंट कारमेल कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पण मॉडेलिंगच्या ऑफर आल्या आणि तिने शिक्षण सोडून दिले. बॉलिवूडमध्ये शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) ओम शांती ओममधून दीपिकाने पदार्पण केले आणि आज ती यशस्वी नायिका आहे. अभिनेता रणवीर सिंहसोबत संसाराला लागलेल्या दीपिकाची संपत्ती कोट्यवधी रुपयांची आहे.

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) : निक जोनासबरोबर लग्न करून हॉलिवुडमध्येही लोकप्रिय झालेली प्रियंका चोप्राही (Priyanka Chopra) फक्त बारावी पास आहे. प्रियांकाला खरे तरक्रिमिनल सायकोलॉजिस्ट बनायचे होते. यासाठी तिने मुंबईतील जयहिंद कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला होता. परंतु ती मिस इंडिया झाली. त्यानंतर तिच्याकडे मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या आणि नंतर बॉलिवुडमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे तिने पुढे शिक्षणच घेतले नाही.

आलिया भट्ट (Alia Bhatt) : आलिया भट्टही (Alia Bhatt) फक्त बारावी पास आहे. आलियाने आपले शिक्षण जुहू येथील जमनाबाई नरसी शाळेतून घेतले. आलिया कधीच कॉलेजला गेली नाही. शाळेत असतानाच तिने बॉलिवुडमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता आणि बारावीत असतानाच तिने चित्रपटात काम करण्यास सुुरुवात केली होती. आज ती आघाडीची नायिका झाली आहे.

कंगना रनौत (Kangana Ranaut) : सध्या सगळ्या बॉलिवुडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारी कंगना रनौत (Kangana Ranaut) तर बारावीही पास होऊ शकलेली नाही. बारावीत नापास झाल्यानंतर तिने पुढे शिक्षण घेण्याचा निर्णय रद्द केला आणि बॉलिवुडमध्ये आली. तिला तर इंग्रजीही येत नव्हते. 

सोनम कपूर (Sonam Kapoor) : अनिल कपूरची (Anik Kapoor) मुलगी सोनम कपूरचे (Sonam Kapoor) शिक्षणही फक्त बारावीपर्यंत झाले आहे.  सोनमनेही मुंबईतील आर्य विद्या मंदिरमधून बारावीपर्यंतच शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला पण मध्येच शिक्षण सोडून ती बॉलिवुडमध्ये आली. सोनमने एकदा सांगितले होते, शिक्षण पूर्ण करण्यासाठी चार वर्ष थांबण्याची माझी तयारी नव्हती म्हणून मी शिक्षण सोडले आणि बॉलिवुडमध्ये प्रवेश केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवातABP Majha Headlines :  6:30 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget