एक्स्प्लोर

Sanjay Patil : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी संजय पाटील यांची नियुक्ती

Sanjay Patil : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Sanjay Patil : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी संजय पाटील (Sanjay Patil) यांची शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी नुकताच या पदाचा पदभार स्वीकारला आहे. याआधी ते राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे कोल्हापूर (Kolhapur) चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. 

संजय पाटील यांना प्रशासकीय सेवेच्या अनुभवासह चित्रपट (Movies), रंगभूमी (Drama) आणि सांस्कृतिक क्षेत्राचाही प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक, पु.ल.अकादमीचे प्रकल्प संचालक, राज्य कर उप आयुक्त ( विधी विभाग ) आदी पदावर त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे.

कोण आहेत संजय पाटील? (Who is Sanjay Patil)

संजय पाटील यांची लेखक, कवी, गीतकार, संवादलेखक आदी क्षेत्रातही चतुरस्त्र मुशाफिरी असून त्यांनी 'जोगवा', 'दशक्रिया', 'बंदिशाळा', 'पांगिरा' या चित्रपटांसाठी पटकथा, संवादलेखन, आणि गीत रचना केलेली आहे. तसेच '72 मैल एक प्रवास' या चित्रपटाचे गीतलेखन आणि संवादलेखन तर 'हिरकणी' व 'रेती' चित्रपटाचे  गीतलेखन केले आहे. वरील त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

संजय पाटील यांचे 'आभाळ झेलण्याचे दिवस', 'हरवेलेल्या कवितांची वही', 'दशक्रियेची चित्रकथा', 'शून्य प्रहर', 'लेझीम खेळणारी पोरं','मायलेकी' अशी सहा  पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. 'हरवेलेल्या कवितांची वही' या कवितासंग्रहाला कवियत्री इंदिरा संत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 'लेझीम खेळणारी पोरं' या कवितासंग्रहाला तुका म्हणे साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, बालकवी ठोंबरे पुरस्कार, आरती प्रभू पुरस्कार, विशाखा काव्य पुरस्कार अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच साहित्य क्षेत्रात आजवर केलेल्या कामगिरीसाठी 'यशवंत सन्मान' पुरस्कराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य शासनातर्फे दिला जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट गीतलेखनाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या कै.ग.दि. माडगूळकर या पुरस्काराने चार वेळा सन्मानित करण्यात आले आहे.

रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाबद्दल जाणून घ्या...

शाहिरी-पोवाडा, तमाशा, भजन-कीर्तन, दशावतार, खडी गंमत, नाटक, चित्रपट ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आभूषणं... या आभूषणांचा साज घेऊन नटलेल्या महाराष्ट्राने सांस्कृतिक क्षेत्रात महासंस्कृतीचा झेंडा अटकेपार नेला. याच सांस्कृतिक आभूषणांपैकी एक चित्रपट... सिने इंडस्ट्री म्हणून जगात नावारूपाला आलेल्या मुंबईतल्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीने उत्तरोत्तर प्रगती केली आहे.

संबंधित बातम्या

Mumbai: गोरेगाव फिल्मसिटीमध्ये लवकरच उभारलं जाणार रेल्वे स्टेशन; चित्रपटाच्या शूटिंगसाठी मिळणार नवीन सेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget