Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार, टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती
Adipurush : प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करत 'आदिपुरुष'च्या टीमने या सिनेमात आवश्यक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Adipurush Movie Latest Update : 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच या सिनेमावर टीका होत आहे. सिनेमातील दृश्ये, संवाद, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टींवर टीका होत आहे. पण आता 'आदिपुरुष' सिनेमाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आठवड्याभरात या सिनेमातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद बदलण्यात येणार आहेत. काही दिवसांतच सिनेमाची सुधारित आवृत्ती सिने-रसिकांसमोर येणार आहे. आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ज्या संवादांमुळे जनतेच्या भावना दुखावत आहेत, ते संवाद बदलण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकाने घेतला आहे, असं मुंतशीर म्हणाले.
रामकथा से पहला पाठ जो कोई सीख सकता है, वो है हर भावना का सम्मान करना.
— Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) June 18, 2023
सही या ग़लत, समय के अनुसार बदल जाता है, भावना रह जाती है.
आदिपुरुष में 4000 से भी ज़्यादा पंक्तियों के संवाद मैंने लिखे, 5 पंक्तियों पर कुछ भावनाएँ आहत हुईं.
उन सैकड़ों पंक्तियों में जहाँ श्री राम का यशगान…
'आदिपुरुष' एक कॉन्ट्रोव्हर्सी अनेक
'आदिपुरुष'चा टीझर रिलीज झाल्यापासूनच या सिनेमावर टीका होत आहे. जेव्हा रावणाच्या भूमिकेत असलेला सैफ अली खान एका वटवाघुळावरुन येताना दाखवला गेला तेव्हा ट्रोलिंगला सुरुवात झाली. सिनेमातील रावण हा अल्लाउद्दीन खिलजी किंवा एखादा मुघलकालीन क्रूर शासक असावा अशा पद्धतीने रेखाटला गेला. 'आदिपुरुष' सिनेमातील हनुमानाची प्रेक्षकांना उत्सुकता होता. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने ही भूमिका साकारली आहे. पण जेव्हा त्याचा फर्स्ट लुक समोर आला तेव्हा लोकांनी हा हनुमान मुस्लिम धाटणीचा वाटल्याची टीका सुरू केली.
'आदिपुरुष' हा सिनेमा अतिभव्य बनवण्यासाठी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. त्यावर तब्बल 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण त्याचा प्रभाव मात्र पाच कोटींचाही येत नसल्याची तक्रार चाहते करत आहेत. ट्रेलरमधले डायलॉग जेव्हा समोर आले तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही. पण सिनेमातील डायलॉगवरदेखील आता टीका होत आहे. संवादलेखक मनोज मुंतशीर सध्या फक्त ट्रोलिंग सहन करत आहेत.
संबंधित बातम्या