Adipurush : 500 कोटींचा खर्च, तीन वर्षांची प्रतीक्षा, हजारो कलाकारांची मेहनत.. मल्टिस्टारर 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर पास, पण प्रेक्षकांकडून नापास
Adipurush : 'आदिपुरुष' हा सिनेमा सध्या देशभरात चर्चेत आहे.
Adipurush Movie : ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाची पटकथा रामायणावर आधारित असल्याने या सिनेमाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. पण सिनेमा रिलीज झाला आणि टीका व्हायला सुरुवात झाली. नेटकऱ्यांना या सिनेमातील काही गोष्टी खटकल्याने ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
'आदिपुरुष' एक कॉन्ट्रोव्हर्सी अनेक
'आदिपुरुष'चा टीझर रिलीज झाल्यापासूनच या सिनेमावर टीका होत आहे. जेव्हा रावणाच्या भूमिकेत असलेला सैफ अली खान एका वटवाघुळावरुन येताना दाखवला गेला तेव्हा ट्रोलिंगला सुरुवात झाली. सिनेमातील रावण हा अल्लाउद्दीन खिलजी किंवा एखादा मुघलकालीन क्रूर शासक असावा अशा पद्धतीने रेखाटला गेला आहे. 'आदिपुरुष' सिनेमातील हनुमानाची प्रेक्षकांना उत्सुकता होता. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने ही भूमिका साकारली आहे. पण जेव्हा त्याचा फर्स्ट लुक समोर आला तेव्हा लोकांनी हा हनुमान मुस्लिम धाटणीचा वाटल्याची टीका सुरु केली.
'आदिपुरुष' हा सिनेमा अतिभव्य बनवण्यासाठी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. त्यावर तब्बल 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण त्याचा प्रभाव मात्र पाच कोटींचाही येत नसल्याची तक्रार चाहते करत आहेत. ट्रेलरमधले डायलॉग जेव्हा समोर आले तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही. पण सिनेमातील डायलॉगवरदेखील आता टीका होत आहे. संवादलेखक मनोज मुंतशीर सध्या फक्त ट्रोलिंग सहन करत आहेत.
दूरदर्शनवरचं रामायण बघितलेली पिढी तर हे असलं रामायण सहन करु शकणार नाही. पण, पण त्यानंतर 20 वर्षांनी स्टार प्लसवर आलेलं नवं रामायण पाहिलेली पिढीही हे पचवू शकत नाही आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू आहे. देशातल्या दिग्गज समीक्षकांनीही 'आदिपुरुष'ला नापास केलं आहे.
'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 140 कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जादू दाखवण्यात यशस्वी ठरत आहे. प्रॉडक्शन कॉस्टदेखील लवकरच वसून करेल. वाद, टीका या गोष्टींचा सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर चांगला परिणाम होईल. पण 'आदिपुरुष' कडून प्रेक्षकांची जी अपेक्षा होती ती मात्र पूर्ण झालेली नाही.
'आदिपुरुष' सिनेमातील 'हे' डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल
1. जब बात सही है तो फर्क नहीं पड़ता किसने कही है
2. राम अवतारी है, पर एक दशानन दस राघव पर भारी है
3. आप काल के लिए कालीन बिछा रहे हैं
4. तेरी बुआ का बगीचा नहीं है
5. मरेगा बेटे
6. जली ना? और भी जलेगी! कपड़ा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की
7. बोल दिया जो हमारी बहनों को हाथ लगाएँगे, हम उनकी लंका लगाएँगे
8. मैं इक्ष्वाकु वंश का राघव, आपकी छाती में ब्रह्मास्त्र गाड़ने को विवश हूँ
9. रघुपति राघव राजा राम बोल, वरना आज खड़ा है, कल लेटा हुआ मिलेगा
10. चुपचाप अपना तमाशा समेट और निकल अपने बंदरों को ले कर! मेरे एक सपोले ने तेरे शेषनाग को लम्बा कर दिया।
11. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं
12. गाड़ दो भगवा ध्वज, भारत की बेटी
संबंधित बातम्या