बेडरूममध्ये बोलवत जबरदस्ती ,अश्लील मेसेज..बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
Sharad Kapoor: खार पोलीस ठाण्यात कलम 74,75 आणि 79 अंतर्गत अभिनेता शरद कपूरविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bollywood: बॉलिवूडविश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता शरद कपूरविरुद्ध एका ३२ वर्षीय तरुणीनं विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील खार पोलीस ठाण्यात कलम 74,75 आणि 79 अंतर्गत विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली असून बॉलिवूडमधील महिलांशी गैरवर्तनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ३२ वर्षीय तरुणीनं अभिनेता शरद कपूरविरोधात विनयभंगाची तक्रार नोंदवली होती. यात अभिनेता शरद कपूरनं या तरुणीला घरी बोलवलं होतं. यावेळी त्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या तरुणीनं केलाय.चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अभिनेता शरद कपूरविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
शरद कपूरने तमन्ना, दस्तक, त्रिशक्ती, आणि शाहरुखसोबत जोश सिनेमातही काम केलं आहे. शिवाय गोविंदाच्या क्यूंकी मैं झूट नही बोलता या चित्रपटातही तो दिसला होता. ९० च्या दशकातील लोकप्रीय मालिका स्वाभिमानमध्येही त्याच्या अभिनयाचं कौतूक झालं हेातं.
पीडित तरुणीनं केले गंभीर आरोप
पीडित तरुणीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती आणि शरद फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आले होते. त्यानंतर व्हिडिओ कॉलवर शरदने तिला शूटिंगसंदर्भात भेटायची इच्छा व्यक्त केली. शरदने तिच्याकडे लोकेशन पाठवून खारमधील एका पत्त्यावर येण्यास सांगितले. मात्र, तेथे पोहोचल्यावर ती जागा शरदच्या कार्यालयाऐवजी त्याचे घर असल्याचे तिच्या लक्षात आले.ती तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात पोहोचली असता, एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि आतून शरदने तिला बेडरूममध्ये यायला सांगितले. बेडरूममध्ये पोहोचल्यावर शरद कपड्यांशिवाय बसलेला दिसला, ज्यामुळे तरुणी घाबरल्याचं तिनं सांगितलं. तिने शरदला कपडे घालण्यास सांगितले, पण शरदने तिचे ऐकले नाही आणि तिला जबरदस्तीने पकडण्याचा प्रयत्न केला. महिलेला त्याला धक्का देऊन तिथून पळून जावे लागले.
अश्लील भाषेत मेसेज
संध्याकाळी शरदने व्हॉट्सअपवर या तरुणीला अश्लील भाषेत मेसेज केला. या घटनेची माहिती पीडितेने तिच्या एका मित्राला दिली. त्यानंतर खार पोलीस ठाण्यात जाऊन अभिनेता शरद कपूर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. खार पोलीस ठाण्यात कलम 74,75 आणि 79 अंतर्गत अभिनेता शरद कपूरविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. पीडित तरुणी ही मुलगी अभिनेत्री आणि निर्माती असल्याची प्राथमिक माहिती आहे.