Ankita Prabhu Walawalkar : कोणत्या कारणामुळे वाटलं हाच मुलगा आपल्यासाठी योग्य? चाहत्या प्रश्नावर कोकण हार्टेड गर्ल म्हणाली...
Ankita Prabhu Walawalkar : बिग बॉस फेम अंकिता वालावलकरने आयुष्याचा जोडीदार म्हणून कुणालची निवड का केली याविषयी सांगितलं आहे.
Ankita Prabhu Walawalkar : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमुळे (Bigg Boss Marathi Season 5) कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) ही बरीच चर्चेत आली होती. बिग बॉसच्या घरात अंकिताचा खेळही प्रेक्षकांचा पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळालं. म्हणूनच ती बिग बॉसच्या फिनालेमध्येही दिसली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अंकिता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे विशेष चर्चेत आली. कारण अंकिताने तिच्या प्रेमाची कबुली देत होणाऱ्या नवऱ्यसोबत तिचा फोटो शेअर केला.
अंकिताने नुकतच तिच्या इन्स्टाग्राम मनातलं विचारा असं सेशल घेतलं. यामध्ये तिच्या चाहत्यांनी तिला बरेच प्रश्न विचारले. यामध्ये एका चाहत्याने तिला कोणत्या एका गोष्टीमुळे वाटलं की हाच मुलगा आपल्यासाठी योग्य आहे? त्यावर अंकितानेही तिने आयुष्याचा जोडीदार म्हणून कुणालची निवड का केली याचं उत्तर दिलं आहे. अंकिताच्या या उत्तराने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अंकिताने काय म्हटलं?
तुझी आणि कुणाल दादाची जोडी खूपच गोड आहे..कोणत्या एका गोष्टीमुळे तुला वाटलं की हाच मुलगा आपल्यासाठी योग्य? यावर अंकिताने म्हटलं की, यासाठी अनेक कारणं आहेत..माझ्यातल्या मला शोधण्यासाठी त्याने मदत केली... कारण ती हरवली होती. एखाद्या ओपन पुस्तकासारखं त्याने मला वाचून काढलं आणि तो माझी शांतताही ऐकू शकतो. माझ्या प्रामाणिकपणावर, माझ्या हेतूवर आणि माझ्या कष्टांवर तो कधीही शंका घेत नाही. जेव्हा मी पुर्णपणे गोंधळेली असते, तेव्हा तो गुंता सोडवण्यात तो मदत करतो".
अंकिताचं लग्न फेब्रुवारीत!
अंकिता वालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल बिगबॉस मराठीच्या पाचव्या पर्वात झळकत घरोघरी पोहोचली. आता तिच्या लग्नाची सोशल मीडियावर सगळीकडे चर्चा आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर तिनं चाहत्यांना ती लग्न करणार असल्याचं सांगत सरप्राईज दिलं होतं. एका मुलाखतीत फेब्रुवारीत लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं.तिनं अद्याप तिच्या लग्नाची तारीख कोणालाही सांगितली नसली तरी आपल्या लग्नाविषयी अपडेट देत अंकिता चाहत्यांची उत्सुकता वाढवत असते.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Ankita Walavalkar: कोकण हार्टेड गर्लला प्रीवेडिंगचे वेध! नवऱ्यासोबत फोटो टाकत चाहत्यांनाच विचारलं..