Entertainment News Live Updates 13 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
'लाल सिंह चड्ढा'नंतर शाहरुखच्या 'पठाण' सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी
Shahrukh Khan Pathaan On Twitter : बॉलिवूडच्या अनेक सिनेमांवर सध्या बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज कोणत्या ना कोणत्या सिनेमावर किंवा कलाकारांवर बहिष्कार टाकला जात आहे. नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'लाल सिंह चड्ढा' आणि अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन' सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. अशातच आता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी 'पठाण'(Pathaan) सिनेमावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.
Coming Soon #BoycottPathan after successful blockbusted by #BoycottLalSinghChaddha #Boycott_Lal_Singh_Chaddha https://t.co/8YKJvsTfPA
— Indian Ashish🇮🇳 (@ashishbangar25) August 12, 2022
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य येणार यशसमोर
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत परीचा ड्रायव्हर म्हणून नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री झाली आहे. मालिकेच्या आगामी भागात अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य यशसमोर येणार आहे.
प्रेम आणि विश्वासाचं अनोख उदाहरण, 'ती माझी प्रेमकथा' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
आयुष्यात प्रत्येकजण एकदा का होईना प्रेमात पडतोच. तर प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची भाषा ही निरनिराळी असते, काहींचे प्रेम हे सफल होते, तर काहींना प्रेमात यातना सहन कराव्या लागतात. प्रेमात एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे विश्वास, मात्र प्रेमींमधील हा विश्वास डगमगला, तर त्या प्रेमाचे पुढे काय होते हे 'ती माझी प्रेमकथा' (Ti Majhi Premkatha) या प्रेममय चित्रपटातून येत्या 30 सप्टेंबरला प्रेक्षकांसमोर येणार आहे. एकुणच हा चित्रपट फक्त प्रेमकथा नसून, आजच्या तरूण पिढीला एक मोठा संदेश आहे. नुकतेच या चित्रपटाचे रोमँटिक पोस्टर सिनेरसिकांच्या भेटीस आले आहे.
Raju Srivastava : राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर, कुटुंबीयांनी दिली माहिती
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. राजू श्रीवास्तव यांच्या बोटांनंतर आता त्यांच्या खांद्यांचीही हालचाल सुरू झाली आहे. डॉक्टर देखील याला चांगले लक्षण मानत आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहोत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत आणि सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कृपया कोणत्याही अफवा किंवा खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका.’
'लाल सिंह चड्ढा'च्या कमाईचा आकडा घसरला! पाहा दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन
बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर फारच वाईट अवस्था आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी केवळ 7 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई 19 कोटींच्या घरात जाणार आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 12 कोटींचा व्यवसाय केला होता. आमिरच्या आतापर्यंत रिलीज झालेल्या चित्रपटांच्या पहिल्या दिवशी सर्वात कमी कलेक्शन मानले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
