एक्स्प्लोर

ABP Majha Impact : मुंबई आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा आता एक दिवसा आड, विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर कुलगुरूंचा निर्णय

Mumbai University of Health Sciences Exam Dates : कोणतीही सुट्टी न घेता सलगपणे परीक्षा घेण्याला विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर विद्यापीठाने आपला निर्णय बदलला आहे. 

Mumbai University of Health Sciences Exam : 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर वैद्यकीय शिक्षणातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्रांच्या परीक्षा आता एक दिवसाआड घेण्यात येणार आहेत. विद्यार्थांशी संवाद साधल्यानंतर कुलगुरूंनी मुंबई आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंनी हा निर्णय जाहीर केला. या आधी या परीक्षा मध्ये कोणतीही सुट्टी न घेता सलगपणे घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. 

विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर विद्यापीठाचा निर्णय

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्या शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार या वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा एका महिन्याच्या आत घेण्यात याव्या असे निर्देश देण्यात आले होते. मुंबई आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चान्वये विद्यापीठातर्फे हिवाळी सत्र 2024 पासून या परीक्षा एक दिवसाची सुट्टी न देता सलग घेण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते. 

आयोगाच्या या निर्णयाला मात्र विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. वैद्यकीय अभ्यासक्रमांची काठीण्य पातळी बघता आणि विद्यार्थ्यांचा मानसिक ताण बघता या परीक्षांमध्ये एक दिवसाआड परीक्षा घेतली जावी, तशी एक दिवसाची सुट्टी दिली जावी अशी मागणी केली जात होती. 

याबाबत विद्यार्थ्यांच्या प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने  कुलगुरुंनी विद्यार्थ्यांसोबत झूम मिटींगद्वारे संवाद साधला. या दरम्यान एक दिवस आड परीक्षा घेणेबाबत ऑनलाईन मतदान प्रक्रिया (Opinion Poll) राबवली असता बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल हा एक दिवस आड परीक्षा घ्यावी असा दिसून आला. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पूर्वीप्रमाणेच एक दिवस आड परीक्षा घेणेबाबत सहमती झाली.

ही बातमी वाचा: 

Maharashtra University of Health Sciences, Mumbai University of Health Sciences Exam , 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray on Saugat-e-Modi : बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगाते मोदी देणारShivsena Uddhav Thackeray PC : भाजपने हिंदुत्व सोडलं असं जाहीर करावं, ठाकरेंची सडकून टीकाNashik Trimbakeshwar Kumbhकुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा?साधूमहंतांचं म्हणणं काय?Special ReportABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Prakash Ambedkar: देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
Embed widget