एक्स्प्लोर

Ulhasnagar Firing : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी पोलीसच साक्षीदार, जखमी महेश गायकवाडांवर आयसीयुमध्ये उपचार

Ganpat Gaikwad vs Mahesh Gaikwad : उल्हासनगर गोळीबार याप्रकरणी सर्व ऑनड्युटी उल्हासनगर हिललाईन पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या घटनेत साक्षीदार आहेत.

BJP MLA Ganpat Gaikwad Firing : उल्हासनगरमधील (Ulhasnagar) हिल लाईन पोलीस (Hill Line Police Station) ठाण्यातील (Thane) गोळीबार (Firing) प्रकरणी पोलीसच (Police) साक्षीदार (Witness) बनले आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाडसह (Mahesh Gaikwad) राहुल पाटील (Rahul Patil) यांच्यावर गोळीबार (Firing) केला होता. महत्त्वाचं म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोरच ही गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे आता या प्रकरणी उपस्थित सर्व पोलिसांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.

उल्हासनगर गोळीबार प्रकरणी पोलीसच साक्षीदार

उल्हासनगर गोळीबार याप्रकरणी सर्व ऑनड्युटी उल्हासनगर हिललाईन पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या घटनेत साक्षीदार आहेत. त्यामुळे पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी असलेले साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून आता हिललाईन पोलिसांचे देखील जबाब नोंदवले जाणार आहेत. शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणारे गणपत गायकवाड सध्या अटकेत आहेत.

हिल लाईन पोलीस ठाणे गोळीबार प्रकरण

उल्हासनगर गोळीबार प्रकारणातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. ज्युपिटर हॉस्पिटल येथे महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. राहुल पाटील यांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. तर, महेश गायकवाड यांच्यावर अजून देखील आयसीयुमध्ये उपचार सुरु आहेत. महेश गायकवाड यांची परिस्थिती अजून देखील चिंताजनक असून औषध उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच गोळीबार

भाजप आमदार गोळीबार प्रकरणात हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये गोळीबार घडला होता. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्यासह काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्षदर्शी बनले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी आमदार गायकवाड यांना गोळीबार करताना प्रतिकार केला होता.

प्रकरणी पुढील चौकशी सुरु

भाजपा आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात सोमवारी कल्याण क्राईम ब्रांच, उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पथक दाखल झाले होते. तक्रारदार चैनू जाधव यांच्यासह महेश गायकवाड यांचा खाजगी अंगरक्षक शेखर धनवे यांची चौकशी करण्यात आली. महेश गायकवाड यांच्या हल्ला झाला त्यादरम्यान खाजगी अंगरक्षक शेखर धनवे याला केबिनमध्येच आमदार गायकवाड यांचे समर्थक सरवणकर आणि हर्षल केने यांनी मारहाण केली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ganpat Gaikwad : गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, सुनावणीदरम्यान नेमकं काय झालं? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Police Custody : प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टाचा निकालAsim Sarode On Prashant Koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकरने आलिशान गाड्या कुठून आणल्या याचा शोध घ्यावाABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 25 March 2025 दुपारी 02 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar Hearing Kolhapur : कोर्टात कोरटकरला घाम फुटला; सरकारी वकिलांकडून पोलीस कोठडीची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी, 28 तारखेपर्यंत सरकारी 'पाहुणचार'
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी, 28 तारखेपर्यंत सरकारी 'पाहुणचार'
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
Embed widget