Ganpat Gaikwad : गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, सुनावणीदरम्यान नेमकं काय झालं?
गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकणावर उल्हासनगर कोर्टात सुनावणी झाली असून यावेळी पोलिसांनी गणपत गायकवाड यांची 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली.
![Ganpat Gaikwad : गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, सुनावणीदरम्यान नेमकं काय झालं? Ganpat Gaikwad should be given police custody for 14 days police demand in court Ulhasnagar rada BJP MLA Ganpat Gaikwad Shoot Shinde Group leader Mahesh Gaikwad detail marathi news Ganpat Gaikwad : गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, सुनावणीदरम्यान नेमकं काय झालं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/03/807da96914f5cec03840f514b3279cad1706964160662720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. पण अवघ्या काही मिनिटांत गणपत गायकवाड यांना कोर्टातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.
गोळीबाराप्रकरणी उल्हासनगर कोर्टात सुनावणी घेण्यात आली. सुरुवातीला गणपत गायकवाड यांना व्हीसीद्वारे कोर्टात हजर करणार असल्याचं सागंण्यात आलं होतं. पण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता व्हीसीद्वारे हजर न करता प्रत्यक्षात गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. तसेच यावेळी पोलिसांनी गणपत गायकवाड यांची 14 दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाकडे मागण्यात आली आहे.
सुनावणीदरम्यान नेमकं काय झालं?
न्यायाधीश ए.ए निकम यांच्या बेंचसमोर ही सुनावणी घेण्यात आली. गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी कोर्टात दिली. त्यानंतर गणपत गायकवाड यांची बंदूक पोलिसांकडून जप्त करण्यात आली. तसेच या प्रकरणात आम्हाला सखोल चौकशी करायची असून फरार आरोपींचा देखील आम्हाला शोध घ्यायचा आहे, असंही पोलिसांनी कोर्टात सांगितलं. पोलिसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली, त्यानंतर कोर्टाने त्यांचा निकाल हा राखून ठेवला होता. पण आता गणपत गायकवाड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
कोर्टातला युक्तिवाद नेमका काय?
घटनेचं सीसीटीव्ही कसं बाहेर गेलं असा सवाल गणपत गायकवाड यांचे वकिल राहुल आरोटे यांनी कोर्टात उपस्थित केलाय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमधील सीसीटीव्ही लिक होतं. हे जाणून बुजून करण्यात आलंय, असा दावा देखील वकिलांनी यावेळी केला. तसेच महेश गायकवाड यांना 6 गोळ्या लागल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला, त्यावरही गणपत गायकवाड यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला.
घटनेचं सीसीटीव्ही समोर
हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यासह इतरांसोबत होते. या दोन्ही गटात आधी बसून सुरू असलेल्या चर्चेत अचानक वातावरण तापलं आणि आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पिस्तुल काढून गोळीबाराला सुरूवात केली. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना या गोळीबारात गोळ्या लागल्या. गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर तातडीने एका पोलिसाने आत धाव घेतली. मात्र तोवर आमदार गायकवाड हे महेश गायकवाडला मारहाण करत होते. त्यांना रोखण्याचा पोलीस कर्मचाऱ्याने प्रयत्न केला. त्याचवेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनीही आत धाव घेतली. दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांशी तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांवर खुर्च्या उचलून कार्यकर्त्यांची हाणामारी झाली.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)