एक्स्प्लोर

Shirdi Crime: शिर्डी पुन्हा हादरली! घरगुती वादातून पोटच्या पोरानेच बापाला संपवले, नामानिराळा राहण्याचा प्रयत्न फसला अन्..

6 मार्चला घडलेल्या या घटनेचा पाच दिवसानंतर उलगडा झाला

Shirdi Crime: महिनाभरापूर्वी तासाभऱ्याच्या अंतराने साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांना भोसकत संपवल्यानंतर दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ही घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत घरगुती वादातून पोटच्या मुलानेच वडिलांची पाईपने जबर मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी हत्या दडवण्याचा प्रयत्न करत नामानिराळा राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाच पितळ शवविच्छेदन अहवालातून उघडे पडले आहे .आकस्मिक मृत्यूच्या नावाखाली वडिलांच्या हत्येच्या पापापासून पासून सुटू पाहणाऱ्या मुलाविरोधात पोलिसांनीच तक्रार नोंदवत त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे .  6 मार्चला घडलेल्या या घटनेचा पाच दिवसानंतर उलगडा झाला असून अकस्मात मृत्यू दाखवत हत्या लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे आता उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिर्डी पोलिसांनी आरोपी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Murder Case)

नक्की घडले काय?

दत्तात्रय शंकर गोंदकर असे मारहाणीतून हत्या झालेल्या 54 वर्षीय वडिलांचे नाव आहे. आरोपी मुलगा शुभम गोंदकर याने घरगुती वादातून वडिलांना पाईपने जबर मारहाण केली. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला. मात्र ही घटना लपवण्यासाठी अकस्मात मृत्यू झाल्याचे सांगत घटना दडवण्याचा त्याने प्रयत्न केला. घटनेच्या शवविच्छेदन अहवालातून जबर मारहाणीतून त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 6 मार्चला घडलेल्या घटनेनंतर पाच दिवसांनी हा खुलासा झालाय. शवविच्छेदन अहवाल समोर येताच शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत हत्येचा गुन्हा दाखल केलाय. 

प्राथमिक माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मध्ये 6 मार्च 2025 रोजी रात्री आठ वाजता ही घटना झाल्याचं कळतंय. शिर्डीचे रहिवासी असलेल्या दत्तात्रय शंकर गोंदकर यांना घरगुती वादातून शुभम गोंदकर या त्यांच्या मुलाने पाईप ने मारहाण केली. ही मारहाण इतकी गंभीर होती की या मारहाणीतच दत्तात्रेय गोंदकर यांचा मृत्यू झाला. मारहाणीत मृत्यू झाल्याचे कोणाला कळू नये म्हणून शुभम गोंकरने वडिलांचा अकस्मात मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र शवविच्छेदन अहवालात त्याचे पितळ उघडे पडले. मारहाणीतच दत्तात्रय गोंदकर यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ही माहिती समोर आल्यानंतर शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्याद नोंदवत पाच दिवसांनी म्हणजेच दहा मार्च 2025 रोजी शुभम गोंदकर वर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (१) अंतर्गत तरुणावर गुन्हा नोंदवला आहे.

शिर्डीत महन्याभरातच दुसरे हत्याकांड!

शिर्डीत महिनाभराच्या अंतराने दुसरे हत्याकांड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 3 फेब्रुवारी 2025 ला पहाटे ड्युटीला जाणाऱ्या साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकत संपवण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण होते. आता महिन्याभराच्या अंतराने शिर्डी पुन्हा हादरली आहे. घरगुती वादातून पोटच्या मुलाने पाईपने वडिलांना बेदम मारहाण करत संपवल्याची घटना घडली आहे. आधी हत्या दडवण्याचा प्रयत्न करत नामानिराळा राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाच पितळ शवविच्छेदन अहवालातून उघडे पडले आहे .आकस्मिक मृत्यूच्या नावाखाली वडिलांच्या हत्येच्या पापापासून पासून सुटू पाहणाऱ्या मुलाविरोधात पोलिसांनीच तक्रार नोंदवत त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे .

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01PM 25 March 2025 दुपारी 01 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar Hearing Kolhapur : दुसऱ्या दरवाजाने कोरटकर कोर्टात, शिवप्रेमी संतप्त, पायताण देऊन घोषणाABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 25 March 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Aurangzeb & Sambhaji Maharaj: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यावर पंडितांनी मनुस्मृतीची पद्धत वापरायला सांगितली; काँग्रेसच्या हुसेन दलवाईंचं वक्तव्य
औरंगजेबाने संभाजी महाराजांना मनस्मृतीप्रमाणे मारलं, पंडितांनी पद्धत सांगितली: हुसेन दलवाई
Ambadas Danve : अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
Embed widget