(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लाखोंचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवाद्यांला अटक; गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी
Gadchiroli Police Arrested Naxal : सुरक्षा दलाच्या नक्षलीविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सरकारने बक्षीस जाहीर केलेल्या जहाल माओवाद्यास अटक करण्यास गडचिरोली पोलिसांना यश मिळाले आहे.
Gadchiroli Naxal गडचिरोली : सुरक्षा दलाच्या नक्षलीविरोधी (Naxal) मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सरकारने बक्षीस जाहीर केलेल्या जहाल माओवाद्यास अटक करण्यास गडचिरोली पोलिसांना (Gadchiroli Police) यश मिळाले आहे. जहाल माओवादी शंकर वंगा कुडयाम (Maoist) याला सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली आहे. माओवादी शंकर वंगा कुडयाम याच्यावर सरकारने दीड लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलिसांच्या (Gadchiroili Police) विशेष पोलीस दलाच्या (CRPF) जवानांनी ही कारवाई केलीय. अहेरी तालुक्यातील सिरोंचा ते कालेश्वरमकडे (तेलगंणा) जाणाऱ्या रोडवर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान त्याला अटक करण्यात आलीय.
कट्टर समर्थकास अटक
फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे असे देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नक्षलावादी कारवाई करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास (समर्थकास) अटक केले आहे.
अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय
पोलिसांनी अटक केलेला हा जहाल माओवादी सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपासात पोलिसांना असे दिसून आले आहे की, शंकर वंगा कुडयाम हा कट्टर माओवादी समर्थक आहे आणि तो माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना इतर मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायद्याची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे, स्फोटके लावने अशी अनेक कामे तो करीत होता. त्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिलीय.
महाराष्ट्र शासनाने 1.5 लाख रुपयांचे बक्षीस केले होते जाहीर
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 79 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे पकडण्यात आलेल्या शंकर वंगा कुडयाम याच्या अटकेवर महाराष्ट्र शासनाने 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.त्यामुळे गडचिरोली पोलिसांनी त्याला अटक केल्याने ही एक मोठी कामगिरी असल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या