धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच अत्याचार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) घडलीय.
![धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, छत्रपती संभाजीनगरमधील घटना Chhatrapati Sambhajinagar two minor girls were abused by the ashram chalak crime news Kannad police धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, छत्रपती संभाजीनगरमधील घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/24/cc93bc2b984d11648ea9d988516abc1d1724507501180339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chhatrapati Sambhajinagar News : आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच अत्याचार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) घडलीय. दादासाहेब अकोलकर (वय 67) या आरोपीविरुद्ध कन्नड पोलीस ठाण्यात (Kannad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारात गेल्या दहा वर्षांपासून आध्यात्मिक शिक्षण, वादन, गायनाचे प्रशिक्षण देण्यासाठी आश्रम चालवण्यात येतो. या आश्रमातील मुली जवळच असलेल्या एका शाळेत शिक्षण घेतात आणि शाळा सुटल्यानंतर आश्रमात परत येतात.
20 ऑगस्ट रोजी रात्री आश्रमचालक दादासाहेब पुंडलिक अकोलकर याने दोन अल्पवयीन मुलींना आपल्या खोलीत बोलावून लज्जा वाटेल असेल कृत्य करत लैंगिक अत्याचार केले. शिवाय, या घटनेची वाच्यता केल्यास आश्रमातून हाकलून देण्याची धमकी दिली. पीडित मुलींकडे मोबाईल नसल्याने आणि आश्रमचालकाची दहशत असल्याने दोन दिवस त्यांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. पीडिताच्या पालकांनी आज आश्रमात येऊन आश्रमचालक दादा महाराज अकोलकर यास जाब विचारला मात्र त्याने उडवाउडवीची उतरे दिली. याप्रकरणी पीडित मुलींच्या फिर्यादीवरून दादासाहेब पुंडलिक अकोलकर ऊर्फ दादा महाराज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pune Crime : आधी अल्पवयीन मुलाचे अपहरण, मग अनैसर्गिक अत्याचार करून हत्या; पुण्यात पुन्हा एकदा थरकाप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)