(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : शेअर बाजारात त्सुनामी, गुंतवणूकदारांना 10 लाख कोटीचा झटका, या 12 शेअर्सना फटका!
शेअअर मार्केटमघधून एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. आज सकाळपासून शेअर बाजारात मोठी घसरण (Stock Market Crash) दिसून येत आहे. याचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.
Stock Market Crash: शेअअर मार्केटमघधून एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. आज सकाळपासून शेअर बाजारात मोठी घसरण (Stock Market Crash) दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजार कमी तोट्यात होता, पण हळूहळू तीव्र घसरण होत गेली. काही वेळातच गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
बँक निफ्टी, स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकांमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली आहे. बँक निफ्टीमध्ये 1100 हून अधिक अंकांची घसरण झाली आहे. तर सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला होता. याशिवाय निफ्टी 300 अंकांनी घसरला होता.
गुंतवणूकदारांना तब्बल 10 लाख कोटींचा दणका
गेल्या काही दिवसांपासून तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणूकदारांची सततची माघार यामुळे भारतीय शेअर बाजार दबावाखाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दररोज घसरत आहेत. आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप पोर्टफोलिओ शेअर बाजारात त्सुनामीप्रमाणे कोसळले. BSE लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 9.8 लाख कोटी रुपयांनी घसरुन 435.1 लाख कोटी रुपयांवर आले आहे. याचा अर्थ केवळ एका दिवसात गुंतवणूकदारांचे मूल्यांकन सुमारे 10 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
इंडसइंड बँकेचा शेअर 19 टक्क्यांनी घसरला
आज सकाळी 80,187.34 अंकांवर सेन्सेक्स उघडला, तर त्याची दिवसाची उच्च पातळी 80,253.19 होती. बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्स -663 अंकांनी घसरला आणि 79,402.29 वर बंद झाला. निफ्टी 218.60 अंकांनी घसरला आणि 24,180.80 वर बंद झाला, जो आज सकाळी 24,418.05 वर उघडला होता. बीएसईच्या शीर्ष 30 समभागांपैकी 20 समभाग घसरत होते, तर 10 समभाग वधारत होते. इंडसइंड बँकेचा शेअर 18.79 टक्क्यांनी घसरून 1038 रुपयांवर आला.
या शेअर्समध्ये झाली घसरण?
इंडसइंड बँकेचा शेअर 18.79 टक्क्यांनी घसरला आणि 1038 रुपयांवर बंद झाला.
पूनावाला फिनकॉर्पचे शेअर्स 17.19 टक्क्यांनी घसरून 297 रुपयांवर होते.
डिक्सन टेक्नॉलॉजीजचा शेअर 7.43 टक्क्यांनी घसरून 13,937 रुपयांवर बंद झाला.
एचपीसीएलचे समभाग ८ टक्क्यांनी तर पतंजली फूडचे समभागही 7 टक्क्यांनी घसरले.
चेन्नई पेट्रो कॉर्प, हिंदुस्थान कॉपर आणि गो डिजिटचे शेअर्स 6.5 टक्क्यांनी घसरले.
लार्जकॅपमध्ये अदानी ग्रीन सोल्युशन आणि अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 5.84 टक्क्यांनी घसरले होते.
बीपीसीएल आणि श्रीराम फायनान्सचे शेअर्सही जवळपास 5 टक्क्यांनी घसरले.