(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मासेमारी हंगामाचा उद्या शेवटचा दिवस, 2 महिने लिलाव राहणार बंद, कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणार ठप्प
Fishing season : मान्सून दाखल झाल्यामुळं मासेमारी हंगाम (Fishing season) बंद करण्यात येणार आहे. उद्या (31 मे) हा मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस आहे.
Fishing season : भारतात मान्सूनचं (Monsoon) आगमन झालं आहे. केरळ (Keral) आणि ईशान्य भारतात मान्सूननं एकत्रच हजेरी लावलीय. मान्सून दाखल झाल्यामुळं मासेमारी हंगाम (Fishing season) बंद करण्यात येणार आहे. उद्या (31 मे) हा मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं उद्यापासून पुढील 2 महिने लिलाव मासळीचे लिलाव बंद राहणार आहेत. त्यामुळं कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे.
पावसाळ्यात मासळी प्रजोत्पादन कालावधी असल्याने मासेमारी बंद
31 मे दिवस यावर्षीच्या मासेमारी हंगामातील शेवटचा दिवस आहे. रत्नागिरीतील हर्णे बंदरातील मासळी लिलाव पुढील दोन महिने बंद राहणार आहेत. यामुळं कोट्यावधी रुपयांची उलाढाल देखील ठप्प होणार आहे. पावसाळ्यात मासळी प्रजोत्पादन कालावधी असल्याने मासेमारी बंद राहणार आहे. समुद्रातील मासेमारीला दरवर्षी पावसाळ्यात एक जून ते 31 जुलैपर्यंत मत्स्य विभागाकडून बंदी घालण्यात येते. या कालावधीत यांत्रिक मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. आता चालू हंगामातील मासेमारीला केवळ एकच दिवस शिल्लक असून एक जून पासून मासेमारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं हर्णे बंदरातील लिलाव पुढील दोन महिने बंद राहणार आहे.
मासेमारी केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम 2021 नुसार कारवाई होणार
पावसाळ्यात मासळी प्रजोत्पादन कालावधी असल्याने मासेमारी बंद ठेवण्यात येते. या कालावधीत मासेमारी केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम 2021 च्या कलम 14 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.
ऑगस्टमध्ये मासेमारी पुन्हा सुरू होणार
मासेमारी बंदीच्या काळात ट्रॉलरमधील कामगार त्यांच्या मूळ गावी निघून जातात. हे कामगार ऑगस्टमध्ये कामकाज सुरू करण्यासाठी जुलैच्या शेवटी किनारपट्टीच्या राज्यात परत येतात. ट्रॉलरवर काम करणारे बहुतांश कामगार हे इतर राज्यातील आहेत, ज्यांना मासेमारी बंदीच्या काळात सुट्टी मिळते. इतर काळ त्यांना मासेमारी करावी लागते. दरम्यान, माशांच्या प्रजननासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून किनारपट्टीच्या राज्यात दरवर्षी ही बंदी लागू केली जाते. तसेच या काळात समुद्रातील खराब हवामानामुळे कोणीही मासेमारीसाठी जात नाही. सर्व बोटी जेटींवर ठेवल्या आहेत. दरम्यान, बंदी कालावधीत कोणी मासेमारी करताना आढळल्यास कारवाई करण्यात येते. फक्त दोन महिन्यांच्या कालावधीसाठीच ही मासेमारी बंद ठेवण्यात येणार आहे. परत सर्व कामगार हे 1 ऑगस्टनंतर नियमीतप्रमाणे मासेमारी सुरु करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या: