'पापलेट'ला जीआय मानांकन मिळणार, तर अवैध मासेमारी रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती
Pomfret Fish GI Rating: पापलेट या मास्याचे जीआय मानांकन करणार, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया, अवैध मासेमारी रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा
Pomfret Fish GI Rating: सर्व खाद्यप्रेमींच्या आवडत्या चविष्ठ पापलेट माशाला (Pomfret Fish) राज्यमासा घोषित केल्यानंतर आता पापलेट (Pomfret) माशाचं जीआय नामांकन दिलं जाणार आहे. यासंदर्भात मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माहिती दिली आहे. अवैध मासेमारी रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगाही उचलण्यात येणार आहे. आतापर्यंत सहाशे नऊ कारवाया करत तीन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, 13 पॉईंट पाचपेक्षा कमी सेंटिमीटर आकाराचा पापलेट मासा पकडण्यावरही बंदी घालण्यात आल्याची माहितीही वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
अवैध मासेमारी रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई : सुधीर मुनगंटीवार
अवैध मासेमारी रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. आतापर्यंत 609 कारवाया करण्यात आल्या असून तब्बल 3 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 13 पॉईंट पाचपेक्षा कमी सेंटिमीटर आकाराचा पापलेट मासा पकडण्यावरही बंदी घालण्यात आल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
कोणतीही परवानगी न घेता आणि छोटे मासे जेव्हा पकडले जातात, त्यामुळे भविष्यामध्ये मासे टंचाई होण्याची शक्यता आहे. म्हणून आत्तापर्यंत विविध 609 कारवाया करत 3 कोटी रुपये दंड वसूल केला आहे. पापलेट मासा जो आहे, त्याचा नैसर्गिक अधिवास म्हणजे, समुद्र आहे त्याला राज्य मासा म्हणून घोषित केलं आहे.
प्रजननासाठी योग्य होऊन प्रजनन करत नाही तोपर्यंत मासा पकडता येणार नाही : सुधीर मुनगंटीवार
पापलेट मासा 13.5 सेंटीमीटरचा मासा पकडता येणार नाही, जोपर्यंत प्रजननासाठी योग्य होऊन प्रजनन करत नाही, तोपर्यंत हा मासा पकडता येणार नाही. जाळीची साईजही निश्चित करण्यात आली आहे. तर, जाळीचा प्रकार निश्चित केला. आता आपण जीआय करण्याचं ठरवलं आहे. या माध्यमातून या माशाचं वैशिष्ट्य एक्सपोर्ट करताना लोकांपर्यंत पोहोचवता येईल, त्या माशाचा दर जास्त आहे. जास्त प्रमाणामध्ये हा मासा मच्छिमार बांधवांना पोहोचवण्याच्या दृष्टीनं त्यांना पकडण्याचा दृष्टीनं, त्यांचं संरक्षण राज्य मासा घोषित करताना केलेलं आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.