बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
पंकजाताई मुंडे तुम्ही आज धस विरुद्ध बोलता त्याचे मी स्वागत करते. पण इतक्या क्रूर हत्येबद्दल तुम्ही खरतर रोज बोलायला हवं होतं
मुंबई : राज्यात बीडमधील सरपंच हत्याकांडाच्या घटनेवरुन आक्रोश असताना दुसरीकडे या गोष्टीवरुन राजकारण केलं जात असल्याचा आरोपही काही लोकप्रतिनिधींकडून होत आहे. त्यातच, बीडमधील घटना असल्याने बीड जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे. देशमुख कुटुंबयांच्या न्यायासाठी आज धाराशिव जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्यावेळीही आमदार सुरेश धस व मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर, छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरील प्रश्नावर पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. तसेच, आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांच्यामुळेच बीड बदनाम झाल्याचं म्हटलं. त्यानंतर, आमदार सुरेश धस यांनी बीडचा विषय नसून परळी बदनाम झाल्याचं सांगत पंकजा मुंडेंवर (Pankaja munde) पलटवार केला. त्यानंतर, आता सामाजिक कार्यकर्त्या व बीड प्रकरणावरुन सातत्याने भूमिका घेऊन आवाज उठवणाऱ्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पंकजा मुंडेंना टोला लगावला आहे. बीड आपोआप बदनाम होत नाही, तुम्ही भावा-बहिणींनी बदनाम केल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलं.
पंकजाताई मुंडे तुम्ही आज धस विरुद्ध बोलता त्याचे मी स्वागत करते. पण इतक्या क्रूर हत्येबद्दल तुम्ही खरतर रोज बोलायला हवं होतं, त्या कुटुंबाच्या घरी जायला हवं होतं, जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हायला हवं होतं. बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलंय, तुमच्या दहशतीने, धस पण त्यातलेच एक आहेत, असे म्हणत अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा बीडमधील गुन्हेगारीच्या घटनांवरुन पंकजा मुंडे व धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला आहे.
तुम्ही म्हणता तुम्ही बीड मध्येच राहता आणि तुम्ही एक महिला देखील आहात, पण तुम्ही हे विसरता की हे गुंड तुमचेच आहेत. तुम्हाला सुरक्षा आहे, सामान्य जनतेला नाही. तुमच्या गुंडांची दहशत त्या सामान्य जनतेला भोगावी लागते, असा पलटवारच अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडेंच्या माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवरुन केला आहे. त्यामुळे, अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा बीडप्रकरणावरुन मुंडे बंधु-भगिनींना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
पंकजा मुंडे ताई तुम्ही आज धस विरुद्ध बोलता त्याचे मी स्वागत करते. तुमच्या मतदार संघात झालेल्या इतक्या क्रूर हायतेबद्दल तुम्ही खरतर रोज बोलायला हवं होतं, त्या कुटुंबाच्या घरी जायला हवं होतं, जन आक्रोश मोर्च्यात सहभागी व्हायला हवं होतं. पण तुम्ही ह्यातलं काहीच केलं नाही.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 11, 2025
बीड बदनाम… https://t.co/lxRiEHcQbG
काय म्हणाल्या पंकजा मुंडे
परळी गुन्हेगारी बाबत मला आकडे माहीत नाही. धस यांच्यामुळे तर बीड बदनाम झालं आहे, राजकीय भूमिका न घेता विषय संवेदनशील रीतीने समजून घेतला असता तर बीड अस बदनाम झालं नसते. आमच्या जिल्ह्यात लोक स्वाभिमानी आहेत...मी महिला राजकारणी म्हणून तिथं काम करते. सगळ्यात कष्टाचे जीवन असणारे लोक आमच्या जिल्ह्यातील आहेत. आम्ही काम करतो नाहीतर दरोडे करायला गेलो असतो ना.. अशा घटनेने जिल्हा बदनाम होत असेल तर आरटीआय मधून माझ्या कडे सर्व जिल्ह्यांची महिती आहे.
हेही वाचा
सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं