एक्स्प्लोर

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना

Crime News : पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाकड पोलिसांनी महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.

Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाकड पोलिसांनी महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्या ताब्यातून तिन चार चाकी वाहन आणि चार चाकी वाहनांच्या बनावट चाव्या असा जवळपास 60 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ही जप्त केला आहे. अल्ताफ कासम अत्तार, जुबेर कयामुद्दिन कुरेशी, मुसाहिद अलिहास खान आणि जानिशार कमर आली अशी या चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या चारही आरोपीकडून पोलिसांनी चार चाकी वाहन चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत.  यात पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील चार चाकी वाहन चोरीच्या गुन्ह्याचाही सहभाग असल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलिस उप आयुक्त विशाल गायकवाड यांनी दिली आहे. 

इमारतीच्या टेरेसवर व्यसन करण्यास अटकाव; दोघा भावांना मारहाण

इमारतीच्या टेरेसवर मित्रांना घेऊन मद्यपान आणि धूमपान करणाऱ्या भावांना विरोध करणाऱ्या इमारतीच्या सेक्रेटरीला आणि त्याच्या भावाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगर कॅम्प 1 मधील बेवस चौक येथे खेमदास अपार्टमेंट आहे. या इमारतीच्या 301 क्रमांकाच्या सदनिकेत संतोष चव्हाण हे राहतात. त्यांची मुलं शुभम चव्हाण आणि श्रेयस चव्हाण हे त्यांच्या मित्रांना घेऊन येऊन इमारतीच्या टेरेसवर धिंगाणा घालत धूम्रपान आणि मद्यपान करतात, असा इमारतीच्या रहिवाशांचा आरोप आहे. त्यामुळे इमारतीचे सेक्रेटरी पवन सेवानी आणि इतर सदस्य हे चव्हाण कुटुंबाकडे टेरेसची चावी मागण्यासाठी गेले. तेव्हा शुभम चव्हाण याने आम्ही चावी देणार नाही, ही बिल्डिंग कोणाच्या बापाची नाही, काय करायचे ते करून घ्या अशी भाषा वापरली. 

त्यानंतर झालेल्या वादात संतोष चव्हाण, शुभम चव्हाण, श्रेयस चव्हाण यांनी पवन सेवानी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कपाळावर धारदार शस्त्राने मारून त्यांना जखमी केले. तसेच भावाला वाचवायला गेलेल्या सनी सेवानी याच्या गालावरही धारदार वस्तूने वार केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पंकज त्रिलोकाणी यांनी जखमींना मदत केली आणि पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या घटनेनंतर उल्हासनगर पोलिसांनी सुभम चव्हाण, संतोष चव्हाण, श्रेयस चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे इमारतीतील रहिवासी दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. 

आणखी वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
भविष्यात मोठी MPSC भरती, परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्र्‍यांची महत्त्वाची घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
भविष्यात मोठी MPSC भरती, परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्र्‍यांची महत्त्वाची घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 19 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सRSS On Aurangzeb :औरंगजेबचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, संघाने कान टोचले: Majha Special DiscussionNagpur Aurangzeb Solgan Video : हिंसेपूर्वी जमावाकडून काही धार्मिक घोषणाबाजीही झाल्याची माहितीABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 19 March 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
भविष्यात मोठी MPSC भरती, परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्र्‍यांची महत्त्वाची घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
भविष्यात मोठी MPSC भरती, परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्र्‍यांची महत्त्वाची घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
Hardik Pandya : 'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
Israel Gaza Airstrike : युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
Embed widget