Windfall Tax: पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्समध्ये घट; पेट्रोल-डिझेल आणि ATF वर किती टॅक्स?
Windfall Tax Cut: देशातील तेल शुद्धीकरण कारखान्यांना मोठा दिलासा देत सरकारनं पुन्हा एकदा पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्स कमी केला आहे.
![Windfall Tax: पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्समध्ये घट; पेट्रोल-डिझेल आणि ATF वर किती टॅक्स? India cut windfall tax on petroleum crude to 4100 rupees from 6400 rupees per ton previously Windfall Tax: पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्समध्ये घट; पेट्रोल-डिझेल आणि ATF वर किती टॅक्स?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/c1715bfe35a03ad37b1088bdae20b6b2167652464499175_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Windfall Tax Cut: केंद्र सरकारनं पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्स (Windfall Tax) कमी करून तो 4100 रुपये प्रति टन केला आहे. यापूर्वी पेट्रोलियम क्रूडवर (Petroleum Crude) 6400 रुपये प्रति टन विंडफॉल टॅक्स आकारला जात होता. नवे कमी केलेले दर आजपासून म्हणजेच, मंगळवारपासून लागू झाले आहेत आणि सरकारनं अधिकृत अधिसूचनेद्वारे याची माहिती दिली आहे. डॉलरच्या बाबतीत, सरकारनं पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्स 50.14 डॉलर प्रति टन कमी केला आहे.
पेट्रोल-डिझेल आणि ATF वर विंडफॉल टॅक्स किती?
भारत सरकारनं पेट्रोल-डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) वरील विंडफॉल टॅक्स शून्यावर कायम ठेवला आहे. म्हणजेच, या पेट्रोलियम उत्पादनांवर कोणताही विंडफॉल टॅक्स नाही.
सरकार विंडफॉल टॅक्स किती वेळा बदलते?
भारत सरकार आंतरराष्ट्रीय किमती आणि इतर घटकांच्या आधारे दर पंधरवड्याला म्हणजेच, दर 15 व्या दिवशी विंडफॉल टॅक्समध्ये बदल करते. ही प्रक्रिया जुलै 2022 पासून सुरू आहे. सरकारनं गेल्या वर्षी जुलैमध्ये पहिल्यांदा हा विंडफॉल टॅक्स लागू केला होता आणि तेव्हापासून हा ट्रेंड सुरू आहे.
गेल्या वेळी टॅक्स कसा होता?
गेल्या वेळी 4 एप्रिल रोजी सरकारनं पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्स त्याच्या पूर्वीच्या 3500 रुपये प्रति टन या किमतीवरून शून्यावर आणला होता. म्हणजेच, त्यावरील विंडफॉल टॅक्स रद्द करण्यात आला. मात्र, त्यानंतर 19 एप्रिल रोजी सरकारनं पुन्हा एकदा क्रूडवरील टॅक्समध्ये बदल करून तो 6400 रुपये प्रति टन केला होता.
विंडफॉल टॅक्स का आकारला जातो?
जुलै 2022 मध्ये भारतात प्रथमच विंडफॉल टॅक्स लागू करण्यात आला आणि पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल देशाबाहेर विकून कमावलेला नफा वसूल करण्यासाठी कच्च्या तेल उत्पादकांवर तो लागू करण्यात आला. खरंतर, खाजगी रिफायनरी या पेट्रोलियम पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करून अधिक नफा कमवत होत्या आणि ते कमी करण्यासाठी देशांतर्गत बाजारपेठेऐवजी तेल उत्पादनं तिथेच विकण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यावर बंधनं लावण्यासाठी सरकारनं हा विंडफॉल टॅक्स आकारण्यास सुरुवात केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)