(Source: ECI/ABP News/ABP Majha)
80C व्यतिरिक्त, कर वाचवण्याचे अनेक पर्याय आहेत! जाणून घ्या सवलत कशी मिळवाल
INCOME TAX RETURN: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. यामध्ये आता रिटर्नची तारीख पुन्हा वाढवली जाण्याची शक्यता नाही.
INCOME TAX RETURN: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. यामध्ये आता रिटर्नची तारीख पुन्हा वाढवली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे ज्यांचे वार्षिक एकूण उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा मंडळींनी आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. सरकार आयकरदात्याला विविध प्रकारच्या आयकर सवलती प्रदान करते. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत येणाऱ्या कर सवलतीबद्दल प्रत्येकाला माहिती आहे.
परंतु बहुतेक लोकांना हे माहित नाही की या X मध्ये दिलेल्या सवलतींव्यतिरिक्त, आयकरदात्याला देखील सूट मिळू शकते. ज्यात पेन्शन फंडामध्ये योगदान, देणग्या, इलेक्ट्रिक वाहन खरेदी आणि वैद्यकीय विमा आणि आरोग्य तपासणीवरील खर्च ही काही कामे आहेत ज्यावर आयकर भरणारा कर सूट मिळवू शकतो. या सर्व उपलब्ध पर्यायांचा वापर केल्यास प्राप्तिकरदाता त्याच्या कर दायित्वांमध्ये लक्षणीय घट करू शकतो.
पेन्शन फंडात सहभाग
जर एखाद्या आयकरदात्याने 2021-22 मध्ये पेन्शन मिळवण्यासाठी विमा कंपनीच्या वार्षिक योजनेत गुंतवणूक केली असेल, तर तो त्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा दावा करू शकतो. कलम 80CCC पेन्शन उत्पादनांच्या खरेदीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट देते. नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मधील गुंतवणुकीवर अतिरिक्त 50,000 रुपये कर सूट मिळू शकते. कलम 80CCD अंतर्गत हा दावा केला जाऊ शकतो.
बचत खात्यावरील व्याज सवलत
एका आर्थिक वर्षात बचत खात्यात व्याज म्हणून मिळालेल्या रु. 10,000 पर्यंतच्या उत्पन्नावर कर सूट मिळू शकते. जर तुम्ही बँक बचत खाते, सहकारी बँक खाते किंवा पोस्ट ऑफिस बचत योजनेच्या स्वरूपात व्याज मिळवले असेल तर तुम्हाला कर सूट मिळण्यास पात्र आहे.
आरोग्य विमा आणि आरोग्य तपासणी
तुम्ही स्वत:साठी आणि तुमच्या कुटुंबासाठी वैद्यकीय पॉलिसी खरेदी केली असल्यास, तुम्ही कलम 80D अंतर्गत कपातीचा दावा करू शकता. या सूटची मर्यादा वार्षिक 25,000 रुपये आहे. याशिवाय, पालकांसाठी स्वतंत्र वजावटीचा दावा केला जाऊ शकतो. पालकांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असल्यास 25,000 रुपयांपर्यंतच्या कपातीवर दावा केला जाऊ शकतो. जर पालकांचे वय 60 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही वार्षिक 50,000 रुपयांच्या कपातीचा दावा करू शकता. तुम्ही आरोग्य तपासणीसाठी वार्षिक 5,000 रुपये खर्च करून कपातीचा दावा करू शकता.
पालकांना घरभाडे देणे
जर तुम्ही तुमच्या पालकांना घरभाडे दिले तर तुम्ही त्यावर कर सूट मागू शकता. घरभाडे भत्ता अंतर्गत ही वजावट कलम 10 (13A) अंतर्गत केली जाऊ शकते. जर एचआरए तुमच्या पगाराच्या पॅकेजचा भाग असेल तरच या सूटचा दावा केला जाऊ शकतो.
देणग्यांवर कर सूट
जर तुम्ही मान्यताप्राप्त संस्था किंवा धर्मादाय संस्थेला देणगी दिली असेल, तर कलम 80G अंतर्गत केलेल्या कर सवलतीवर देणगीच्या रकमेवर दावा केला जाऊ शकतो. यासाठी देणगी चेक, ड्राफ्ट किंवा रोख स्वरूपात देणे आवश्यक आहे. 2,000 रुपयांपेक्षा जास्त देणग्या चेक किंवा ड्राफ्टद्वारे द्याव्या लागतात.
ईव्ही खरेदीवर सूट
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर भरलेल्या व्याजाच्या रकमेवर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. कलम 80EEB अंतर्गत हा दावा करण्यात आला आहे. 2019 च्या अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात आली होती. एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जाते.