मोदी सरकारच्या तिजोरीत मोठी भर, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात झाली 'एवढी' वाढ
देशात निव्वळ प्रत्यक्ष कराच्या संकलनात (Direct income tax collection) मोठी वाढ झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 20.66 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Modi Government : देशात निव्वळ प्रत्यक्ष कराच्या संकलनात (Direct income tax collection) मोठी वाढ झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 20.66 टक्क्यांची वाढ होऊन ते 13.7 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत ते 11,35,754 कोटी रुपये होते.
17 डिसेंबर 2023 पर्यंत 2,25,251 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. केंद्राने 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत 10.60 लाख कोटी रुपयांचा निव्वळ प्रत्यक्ष कर जमा केला आहे. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 13,70,388 कोटी रुपयांमध्ये सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT), कॉर्पोरेट टॅक्स (CIT) आणि वैयक्तिक आयकर (PIT) यांचा समावेश आहे. निव्वळ प्रत्यक्ष कराच्या एकूण रकमेत CIT चा समावेश होतो. 9 94 798 कोटी (निव्वळ परतावा) आणि एसटीटीसह पीआयटी 6 72 962 कोटी आहे.
कर संकलनात सतत वाढ
चालू आर्थिक वर्षासाठी (17 डिसेंबरपर्यंत) प्रत्यक्ष कराच्या एकूण संकलनाचे तात्पुरते आकडे वार्षिक 17.01 टक्के वाढले आहेत. यावेळी एकूण संकलन 15,95,639 कोटी रुपये झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ते 13,63,649 कोटी रुपये होते.
एकूण संकलन – 15,95,639
CIT - 7,90,049 कोटी
PIT - 8,02,902 कोटी
एवढ्या प्रमाणात आगाऊ कर वसुली झाली आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 (17 डिसेंबर पर्यंत) एकूण आगाऊ कर संकलनाचे तात्पुरते आकडे वार्षिक आधारावर 19.94 टक्क्यांनी वाढून 6,25,249 कोटी रुपये झाले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 5,21,302 कोटी रुपयांचे आगाऊ कर संकलन झाले. आगाऊ कर संकलन रकमेमध्ये 4,81,840 कोटी रुपयांचा कॉर्पोरेशन टॅक्स (CIT) समाविष्ट आहे. तर वैयक्तिक आयकर 1,43,404 कोटी रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या: